शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालन यातून शेतकऱ्यांना दूध, शेणखत मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. चांगल्या उत्पादनासाठी पैशांची काळजी घेतली गेली, पाहिजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जनावरांची काळजी त्यांची निगा व्यवस्थित ठेवली पाहिजे.
सध्या पावसाळा चालू आहे, या दिवसात जनावरांची विशेष काळजी घेतली जाणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी.
याबद्दलची सखोल माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
पोट फुगणे –
हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते. कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडे ची डावी बाजू फुगे सारखे दिसते. पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटात साठून राहतो अशावेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.
उपाय- पोटफुगी टाळण्याकरता जनावरांनाहिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोट फुगी चे समस्या टाळता येते. जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषध आणून ठेवावी जेणेकरून जनावरावर वेळेस उपचार करता येतील. पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणूनअर्धा लिटर गोड तेलात 30 मिलि टर्पेंटाइन, 100 ग्रॅम सोडा व पाच ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावरांना ठसका न लागता हळू पाजावे.
हेही वाचा : पशुपालकांनो वासरांचे संगोपन आणि व्यवस्थापन कसे कराल?
खुरातील जखमाच गळणे व त्यात किडे पडणे – पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे तेव्हा त्यात चिखल गेल्यामुळे खुरामध्ये जखमा होतात. सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात. असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगड ते परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
उपाय-जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. जखम पोटॅशियम परमॅग्नेट ने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.
पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार -
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्प सारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालचा जबडा खाली सूज येते, श्वासोश्वास करायला त्रास होतो, जनावराचा 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांना पैकी 90 टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.
उपाय- पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळ रोग, धनुर्वात या आजारावर लसीकरण करून घ्यावे. गढूळ पाण्यामुळे होणारे आजार-पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याची शक्यता अधिक असते.गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो.
उपाय – खाद्याच्या गव्हाणी व पाण्याच्या टाक्यांना चुना लावावा. पाणी शुद्ध होण्याकरिता पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट मिसळावे.
गोचीड, गो माशांचा प्रादुर्भाव – पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड, गो माशांचा प्रादुर्भाव होतो. गोचिडांची लागण जास्त झाल्यास जनावरांच्या लघवी मध्ये रक्त येते व त्यामुळे मूत्राचा रंग कॉफी सारखा दिसतो. गोचीड जनावरांच्या त्वचेला चिकटून बसतात त्यामुळे त्वचेला खाज सुटते. जनावर रंग भिंतीवर घासते किंवा पायाने खाजवण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे जनावरांच्या अंगावर जखमा होतात. जखमांवर वेळीच उपचार न केल्यास त्यावर माश्या बसतातआणि त्यामध्ये किडे पडण्याची शक्यता निर्माण होते. अशा जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो. गोचीड यामुळे जनावरांना विषम ज्वर हा आजार होतो. या आजारात जनावर स्वतःभोवती चक्कर घेते, डोके आपटते.हा आजार संकरित जनावरांना जास्त प्रमाणात दिसून येतो. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते व जनावरांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.
उपाय-जनावरांच्या अंगावर गोठ्यातील गोचीड,गोमाशा प्रतिबंधक औषधांची शिफारसीनुसार फवारणी करावी.गोठ्यातील शेण, मलमूत्राची वेळोवेळी साफसफाई करून गोठा स्वच्छ व कोरडा व हवेशीर ठेवावे.
व्यायला आलेल्या जनावरांची काळजी-पावसाळ्यात जनावर व्यायल्यानंतर जनावर आजाराला बळी पडू शकते. याकाळात व्यायल्यानंतर वार न पडणे, मायांग बाहेर येणे, थंडी ताप, दुग्ध ज्वर अशा प्रकारच्या समस्या जनावरांमध्येआढळून येतात. जनावरांमध्ये वरील समस्या आढळल्यास पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार करून घ्यावे.
हेही वाचा : आयआयटी इंजिनियरने सुरु केला डेअरी फार्म, अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराला मारली लाथ
दुभत्या जनावरांमध्ये होणारा स्तनदाह – जनावर व्यायल्यानंतर 50 ते 60 दिवसांपर्यंतदूध उत्पादनाचे प्रमाण वाढत असते. अशी जनावरे गोठ्यामध्ये शेन, मलमूत्र असलेल्या ठिकाणी बसल्यास कासेच्या शिद्रातून रोगजंतू कासेत प्रवेश करतात व स्तनदा होण्याची शक्यता वाढते.
उपाय- स्तनदाह टाळण्यासाठी दुधाळ जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. जनावरांची कास जंतुनाशक औषधाने धुऊन घ्यावी. दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. आजारी जगावर राज्य दूध शेवटी काढावे. स्तनावर जखम झाली असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करावेत.
बुळकांडी - हा एक विषाणूजन्य आजार असून पॅरा मिकसो नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. दुर्गंधीयुक्त जुलाब, जिभेवर व आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक फुटकुळ्या सारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यातून नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. तोंड येते, पातळ दुर्गंधीयुक्त शेन पडत. शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो व चार ते आठ दिवसात जनावर दगावू शकते. शरीराचे तापमान शेवटी थंड पडते, नाडी व श्वासोश्वास कमी होणे किंवा अगदी मंद होणेहा या रोगाचा शेवटचा टप्पा मानला जातो.
उपाय- प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये या चार विरुद्ध लसीकरण करणे व गोठ्यांची नियमित स्वच्छता करणे तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो आजारी जनावरांची विष्ठा गोठ्यापासून दूर ठेवून खोल पुरवणे फायद्याचे ठरते..
- अतिसार
पावसाळ्यातील प्रमुख आजाराने ते रक्त अतिसार हा कायम दिसून येणारा आजार आहे यामुळे पाण्यासारखे पातळ जुलाब होणे, शरीराच्या तापमानात कमालीची घट येणे, श्वासोश्वास मंदावणे, अशक्तपणा येणे यासारखी प्रमुख लक्षणे दिसून येतात. या रोगाची लागण मुख्यता गढूळ व दूषित पाणी, आहारातील समतोल ढासळल्यामुळे, अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे होतो.
उपाय- प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये जनावरांची वैयक्तिक, तसेच गोठ्याची स्वच्छता राखणे, तसेच जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. निरोगी जनावरांना आजारी जनावरांपासून दूर ठेवावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.
Share your comments