भारतात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. पशुपालन व्यवसायामध्य म्हशी सोबत गाईला तेवढेच महत्त्व आहे. भारतामध्ये गायीच्या वेगळ्या प्रकारच्या जाती आढळतात. परंतु त्यामध्ये देशी गाईंमध्ये आढळणाऱ्या 7 जाती उल्लेखनीय स्वरूपाचे आहेत. या सात जातींविषयी आपण थोडक्यात या लेखात माहिती देऊ...
लाल कंधारी गाय
लाल कंधारी गाय या जाती चा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातील मानला जातो. तसेच ही गाय लखल बुंधा या नावानेही ओळखले जाते. या गाईला दुष्काळी जात मानली जाते. या जातीच्या गाई चा रंगात गडद लाल रंग असून फिकट ते अतिशय गडद अशी व्हरायटी देखील पाहायला मिळते. इतिहासामध्ये राजा सोमदेव राव यांनी कंधार गाईंना राजाश्रय दिल्याचे मानले जाते. शेतीच्या कामामध्ये या जातीच्या बैलांचा उपयोग केला जातो. या जातीच्या गाई वर्षाकाठी सरासरी 598 लिटर दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट 45. 57 टक्के लागतो.
साहिवाल गाय
या जातीच्या गाई ला सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून मानले जाते. या जातीच्या गाई चा उगम हा पाकिस्तान मधील साहिवाल प्रांतातील मो टॅंगो मेरी जिल्ह्यातून झाला आहे. मुलतानी, तेली अशा इतर नावाने या जातीची गाय ओळखले जाते. दूध उत्पादनाचा अतिशय उत्तम अशी ही जात आहे. ही गाय तपकिरी लाल किंवा महोगणी लाल अशा विविध ते मध्ये पाहायला मिळते. ऑस्ट्रेलिया मध्ये या गाईची आयात करून संकरित झेबु गाय तयार केली आहे.
लाल सिंधी गाय
उष्ण हवामानात तग धरून राहणारी म्हणून ही जात प्रसिद्ध आहे. या जायचा जर मूळ उगम पाहिला तर तो पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. या गाईचा रंग पहिला तर लाल असून गडद लाल के फिका पिवळा अशी विविधता पाहायला मिळते. शिंदे मजबूत आणि आडवे वर्तुळाकार वाढलेले दिसून येतात. ही जात ही भरपूर प्रमाणात दूध देणारी जात मानली जाते.. अमेरिका, ब्राझिल्स, श्रीलंका, फिलिपिन्स इत्यादी देशांमध्ये या जातीवर संशोधन आणि संवर्धन करण्यात आले आहे.
गिर गाय
ही गाय देखील साहिवाल व लाल संधी या जाती प्रमाणे भरपूर दूध देणारी गाय आहे. ही गाय सुरती व गुजराती या नावाने देखील ओळखले जाते. गुजरात मध्ये असलेल्यागिर जंगल आवरून या जातीचे नाव पडले आहे. या जातीचे बैल हेच कामांमध्ये अतिशय वेगवान असतात. या जातीची गाय ही त नावा मध्ये सुद्धा तग धरणारी म्हणून ओळखले जाते. या गायीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त दूध देते. तसेच स्तूप आकारातील कपाळ आणि लांब कान ही त्या जातीची ओळख देणारी वैशिष्ट्ये आहेत.
वेचुर गाय
या जातीच्या गाई या केरळ मधील वेचुर येथून उगम पावले आहेत.या गाईचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या गाई या अतिशय बुटके आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी 124 सेंटीमीटर लांबी म्हणजे चार फूट आणि 87 सेंटीमीटर उंची म्हणज तीन फूट असतात. हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात. या गावचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाय उष्ण आणि आर्द्र हवामानाततग धरून ठेवते उंचीच्या मानाने भरपूर दूध देते.
हेही वाचा : कमीत- कमी आहारात जास्त दूध देणारी राठी गाय; वाचा गायीचे वैशिष्ट्ये
खिल्लार गाय
खिल्लार गाय ही पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय आहे. या जातीच्या गाई च्या चार उपजाती पाहायला मिळतात त्या म्हणजे आटपाडी, महाल, म्हसवड, थी ल्लारी, नकली खिल्लार. येडाई चे महत्वाचे दिसून येणारी वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या गाई चे शिंगे लांबट टोकदार तलवारी च्या आकाराचे असतात. रंग हा पांढरा असून मजबूत बांधा हे या जातीच्या गाईंचे वैशिष्ट्य आहे. ही दुष्काळी जात मानली जाते आणि दुधासाठी गाई पेक्षा जास्त शेतीच्या कामासाठी खिल्लार बैल वापरली जातात.
Share your comments