1. पशुधन

काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने केले सिद्ध

दुभत्या जनावरांना गाणी ऐकवली तर दूध उत्पादनात वाढ होते, असे अनेकदा म्हटले जाते. अनेक मोठ्या गोठ्यामध्ये आपण टेप बघतो. मात्र हे खरच सत्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका तरुण शेतकर्‍याने हा प्रयोग यशस्वीरित्या राबविला असून त्याने याचा एक व्हिडीओ देखील तयार केला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

दुभत्या जनावरांना गाणी ऐकवली तर दूध उत्पादनात वाढ होते, असे अनेकदा म्हटले जाते. अनेक मोठ्या गोठ्यामध्ये आपण टेप बघतो. मात्र हे खरच सत्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका तरुण शेतकर्‍याने हा प्रयोग यशस्वीरित्या राबविला असून त्याने याचा एक व्हिडीओ देखील तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

दूध उत्पादन वाढवण्यासाठी हिरव्या चार्‍यावर भर देण्याचा सल्ला अनेकवेळा शेतकर्‍यांच्या कानी पडला असले पण तुर्की येथील इज्जत कोकॅक नावाच्या तरुणाने दुभत्या गायींना हेडफोन लावून गाणी ऐकण्यास लावले. गाणी ऐकणे हे भावनिकदृष्ट्या हे जनावरांसाठी चांगले असते.यामुळे जनावराच्या मानसिक संतुलनावर चांगला परिणाम होत असल्याचे त्याने सांगितले आहे.

यामुळे जनावरे मनाने प्रसंन्न असतात त्यावेळी ते अधिकचेही दूधही देतात, असे इज्जत कोकॅकचे म्हणणे आहे. इज्जत याने १०० गायी पाळल्या आहेत. एक गायीचे दिवसाला साधारण: २२ लिटर दूधाचे उत्पादन होते. मात्र, दुभत्या जनावरांनी जेव्हापासून शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरवात केली तेव्हापासून उत्पादनात वाढ झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे आपलाच फायदा होणार आहे.

ब्रेकिंग! नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

जनावरांना गाणी ऐकवल्यास तब्ब्ल ५ लिटरने वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता गायी दिवसाला २७ लिटर दूध देत असल्याचा दावा त्याने केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर अपलोड केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. यामळे इतर शेतकऱ्यानी देखील असाच प्रयोग करून एकदा तरी बघावे असे त्यांनी म्हटले आहे.

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..

दरम्यान, शेतकऱ्यांचा हक्काचा जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. अनेकदा यामध्ये चढउतार येतो, मात्र शेतकरी हा व्यवसाय सुरूच ठेवतो. बदलत्या काळात यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत. अनेकांनी आधुनिक पद्धतीने गोठा तयार करून लाखो रुपये कमवले आहेत. शेतकरी हा दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये जनावरांना दर्जेदार आहार दिला जातो. 

महत्वाच्या बातम्या;
सफरचंदापेक्षाही महाग सीताफळ, डझनचा दर 400 रुपयांवर..
शेतकऱ्यांनो उस तुटला आता खोडव्याचे करा असे व्यवस्थापन
ब्रेकिंग! विनायक मेटे अपघाताचे खरे कारण आले समोर, चालकास अटक

English Summary: cows are song, they give 5 liters more milk, proved Published on: 18 November 2022, 12:08 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters