1. पशुसंवर्धन

हिवाळ्यात दुधाळ व गाभण जनावरांना होणारे काही संसर्गजन्य आजार, जाणून घेऊ त्याबद्दल

milk animal

milk animal

 दुधाळ आणि गाभण जनावरांची  काळजी तर व्यवस्थित प्रकारे सगळेजणच घेत असतात. परंतु हिवाळ्यामध्ये या जनावरांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. जनावरांच्या आहारामध्ये हिवाळ्यात जर काही कमी राहिली तर जनावरांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. या लेखात आपण  अशा जनावरांमध्ये हिवाळ्यात होणाऱ्या काही संसर्गजन्य आजाराबद्दल माहिती घेऊ.

 

 • लाळ्याखुरकूत:
  • हा एक विषाणूजन्य आजार दुधाळ जनावरांसाठी अत्यंत घातक आहे. या आजाराचा प्रसार हा थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो.
  • या आजारामध्ये जनावरांच्या तोंडामध्ये, जिभेवर तसेच हिरड्या व खुरामध्ये फोड येतात व ते फुटतात व फुटलेल्या जागी जखमा तयार होतात.
  • या आजाराने ग्रस्त जनावरांना भरपूर ताप येतो. तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते व जनावरांचे रवंथ करणे बंद होते. जनावरांचा श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट येते.
  • या महिन्यात खालील वासरांना जर या आजाराचा संसर्ग झाला तर जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते.
  • जनावरांमध्ये झालेल्या जखमा जरी भरून आल्या तरी जनावरांमध्ये विविध व्यंग आढळून येतात. जसे की धाप लागणे, शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे इत्यादी.

उपचार व प्रतिबंधात्मक उपाय

 • लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे त्याच्यावर उपचार नाही.
 • तोंडात किंवा खुरामध्ये झालेल्या जखमांवर दोन टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट च्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. तोंडामध्ये जखम असल्यास बोरो गलिसरिन लावावेव पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सगळ्या प्रकारचे उपचार करून घ्यावेत.
 • तीन महिन्यान वरील सर्व वासरांचे व जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा करून घेणे आवश्यक आहे.
 • लसीकरण हे फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये करावे.

मिल्कफिवर :

 • हा आजार प्रामुख्याने चांगले दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळजनावरांमध्ये व्यायल्यानंतर 48 ते 72 तासां पर्यंत जास्त प्रमाणात आढळतो.

 

 • शरीर व दुधासाठी आवश्यक असलेला कॅल्शियमचा पुरवठा आहारातून न झाल्यास मिल्क फेवर उद्भवतो.
 • या आजाराची लक्षणांची तीन टप्पे असतात.पहिल्या टप्प्यात जनावरांचे खाणे पिणे मंदावते तसेच दूध उत्पादन कमी होते. दुसऱ्या टप्प्यात आजारी जनावर अशक्त होऊन जमिनीवर पोटात मान घालून शांत बसून राहतात.शरीराचे तापमान कमी होते. तसेच श्वसनाचा वेग वाढतो व नाडीचे ठोके देखील वाढतात. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होतात. पोट फुगणे  इत्यादी लक्षणे दिसतात.

या आजारास  प्रतिबंध

 या आजारास आळा घालण्यासाठी गाभण काळातील शेवटचे दोन महिने व केल्यानंतरच्या काळात आहारात कॅल्शियमचा योग्य मात्रेत पुरवठा करावा. आजार होऊ नये यासाठी उपलब्ध प्रतिबंधात्मक औषधे विन्या आगोदर व विल्यानंतर द्यावेत.

 • पोट दुखणे किंवा पोट गच्च होणे :
  • हिवाळ्यात थंडी मध्ये कमी तापमान असताना जास्त प्रमाणात चारा खाल्ला व पाणी पिण्याचे प्रमाण घटले की पोट व आतड्यांची हालचाल मंदावते व जनावरांचे पोट गच्च होते. त्यामुळे जनावरांचे खाणे पिणे मंदावते.शेणपडणे घटते त्यामुळे जनावरांच्या पोटात दुखणे सुरुवात होते.

उपचार व प्रतिबंधात्मक उपाय

 • हिवाळ्यात गोठ्यातील वातावरण उबदार ठेवणे व थंडीपासून दुधाळ जनावरांचे संरक्षणकरणे हा सोपा उपाय आहे.
 • हिवाळ्यात दुधाळ जनावरांना उत्तम खाद्य व चारा खायला दिला पाहिजे पिण्याचे पाणी जास्त थंड असू नये याची काळजी घ्यावी.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters