1. पशुसंवर्धन

करडांच्या वजनावर ठेवा अशाप्रकारे लक्ष

KJ Maharashtra
KJ Maharashtra
करडांच्या वजनावर ठेवा अशाप्रकारे लक्ष

करडांच्या वजनावर ठेवा अशाप्रकारे लक्ष

करडांमध्ये पहिल्यांदा जंतनिर्मूलन २५ व्या दिवसानंतर करावे व नंतर शेण तपासून जंतनिर्मूलन करीत जावे. करडांमध्ये जन्मल्यानंतर २१ दिवसांनी आंत्रविषार लस टोचावी. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी आंत्रविषार लसीची दुसरी मात्रा द्यावी.

शेळीच्या करडांसाठी प्रथिनयुक्त खुराक

१)प्रथिनयुक्त खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १८ टक्के इतके व एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण ७५ टक्के इतके असावे.

२)शेळीपासून वेगळे केलेल्या पिलास उत्तम वाढीसाठी अधिक पोषणतत्त्वांची गरज असते. अशी पोषणतत्त्वे/ अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी करडांना दूध पाजणे बंद करण्याआधीपासूनच प्रथिनयुक्त खुराक दिला जातो.

प्रथिनयुक्त खुराक देण्याचे फायदे

१)प्रथिनयुक्त खाद्य देण्यामुळे शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांचे वजन वाढीसाठी विशेषतः जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. सदर खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २ टक्के इतके असते.

२) कमी वयात विक्री करण्याइतपत करडांचे वजन वाढते.

३) वसंत ऋतूमध्ये जन्मलेल्या (२१ मार्च ते २२ जून) पिलांचे उन्हाळ्यातील उष्णतेमुळे येणारा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यातही करडांचे वजन वाढण्यासही मदत होऊन नफ्यामध्ये वाढ होण्यास मदत होते._

४)शेळीपासून पिलास वेगळे केल्यास पिलावर एक प्रकारचा ताण येतो प्रथिनयुक्त खाद्य पिलास शेळीपासून वेगळे करण्यापूर्वीपासून दिल्यामुळे पिलांवर असा ताण येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच यामुळे वजनात झपाट्याने वाढ होऊन करडे लवकर पैदासक्षम बनतात.

 

प्रथिनयुक्त खाद्य देताना

१)उत्पादकाने प्रथिनयुक्त खाद्य देताना उत्पादन खर्च व वजनवाढ या बाबींचा विचार करून प्रथिनयुक्त खाद्य द्यावे जेणेकरून नफा वाढेल. खाद्य व वजनवाढ यांचे प्रमाण ५-१ असे असावे.

२)बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला मागणी आहे, याचा विचार करून करडांचे व्यवस्थापन करावे.

 

३) करडे खाद्य घटक चाटण्याचे लवकर शिकतात. तसेच करडांमध्ये कोठीपोटीचे कार्य लवकर सुरू होण्यास मदत होते त्यामुळे झपाट्याने व अधिक वजनवाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य ३ ते ५ आठवडे वयापासून देणे अत्यंत गरजेचे आहे.

देशी करडांच्या प्रतिदिन वजन वाढीनुसार वर्गीकरण

अ.क्र. वजनवाढ ग्रॅम्स प्रतिदिन शेरा

१)४० ग्रॅम पेक्षा कमी असमाधानकारक

२) ४० ग्रॅम ते ६० ग्रॅम समाधानकारक

३)६० ग्रॅम ते ८० ग्रॅम चांगल

४)८० ग्रॅम ते १०० ग्रॅम उत्कृष्ट

५)१०० ग्रॅमपेक्षा जास्त अत्यंत उत्कृष्ट

 

लेखक - प्रवीण सरवदे , कराड

प्रतिनिधी - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters