लम्पीच्या आजारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्यातील अनेक पशुपालकांना अद्याप मदत मिळाली नाही. ती कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात २८ हजार जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांचे सरासरी पाच लाख लिटर दुधाचे नुकसान झाले.
असे असताना राष्ट्रीय आपत्ती निवारणच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) बाधित जनावरांच्या मृत्यूनंतर मदत (Animal Insurance) देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. असे असले तरी जनावरांची किंमत आणि शासनाकडून देण्यात येणारी मदत कमी असल्याचे सांगितले जाते.
यामुळे पशुपालकांना संरक्षण देण्यासाठी येत्या काळात सक्षम अशी राज्याची विमा योजना आणण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी दिली. शासनाच्या अत्यल्प मदतीच्या बळावर हे नुकसान कसे भरून निघेल, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात मांडला.
गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा, गायरान हक्क परिषदेत मागणी
आमदार अमोल मिटकरी यांनी पशुपालकांना १५ दिवसांत मदत मिळण्याचे आदेश असताना त्यांच्याच भावाला दोन महिन्यांपासून मदत मिळाली नाही, असे सांगितले. तसेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
मोहिते-पाटील यांनी लम्पी स्कीनबाधित जनावरांचा मुद्दा मांडला होता. जनावर दगावल्यानंतर शासनाकडून मदत म्हणून तोकडी रक्कम दिली जाते. त्यात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
बारामतीत बेकायदा कत्तलखान्याबाबत नगरपालिकेला नोटीस, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिले होत आदेश
दरम्यान, केंद्र सरकारने गोट पॉक्स ही लस देण्याचे जाहीर केले होते. लम्पी स्कीनबाधित पाच किलोमीटर परिसरातील जनावरांनाच ही लस देण्याची सूचना होती. परंतु महाराष्ट्रात पशुपालकांना संरक्षण देत सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे लम्पी स्कीन नियंत्रणात राहिला, अशी माहिती देखील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या;
हाडं गोठवणारी थंडी, बिबट्याची भीती, रात्रीची वीज, शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच..
भीमा पाटसची गाडी अखेर रुळावर, ८ दिवसात १९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकरी समाधानी
Beed Farmers; शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर उचलले पैसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील घटना..
Share your comments