सध्या भारतात दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. असे असले तरी इतर देशाच्या तुलनेत हा दर कमी आहे. दैनंदीन जीवनात सगळीकडे दुधाचा समावेश केला जातो. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश केला जातो. यामुळे जगभरात दुधाची मागणी ही जास्त आहे.
सध्या आपल्या देशात दुधाला ५० रुपये मोजावे लागतात. असे असताना भारताच्या शेजारील देशामध्ये हे दर जास्त आहेत. भारतीय चलनानुसार, एका भारतीय व्यक्तीला चीनमध्ये दूध खरेदी करण्यासाठी सुमारे 114 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच चीनमध्ये दूध पिणे भारतीयांसाठी खूप महाग आहे. तरीदेखील दुधाचा पुरवठा हा जास्त आहे.
तसेच नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वीच दुधाचा दर प्रतिलिटर 85 रुपये निश्चित केला होता. सध्या नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे या देशात देखील दुधाचे दर हे जास्त आहेत. तसेच बांगलादेशात दुधाची किंमत प्रति लिटर 0.73 डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार बांगलादेशात एक लिटर दुधासाठी 60 रुपये मोजावे लागतात.
विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ, अमरसिंह कदम यांचा महावितरणला इशारा
सध्या मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये एक लिटर दुधासाठी तब्बल 170 रुपये मोजावे लागतात. 26 ऑक्टोबर 2022 रोजी कराचीच्या आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली होती. याठिकणी महागाई वाढत चाली आहे. यामुळे श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल, अशी भीती आहे.
दरम्यान, दूध (Milk) हा सर्वांनाच आवश्यक असणारा घटक आहे. आपल्या दैनंदीन जीवनात सगळीकडे दुधाचा समावेश केला जातो. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश केला जातो. सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक रोग आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊस तोडा म्हणून मागे लागा, दरासाठी आंदोलन करा, कोणी सांगितलंय? करा सेंद्रिय गुळाचं उत्पादन, साडेचार लाखांचा नफा
नाद करा की पण आमचा कुठं!! दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..
'आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत'
Share your comments