1. पशुधन

Animal Care: पशुंचे आरोग्य आणि कॅल्शियम यांचा काय आहे परस्पर संबंध? वाचा डिटेल्स

पशुपालन व्यवसायामध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल तर जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. तर आपण जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाचा विचार केला तर ते बर्याच अंशी जनावरांच्या एकंदरीत आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. आहारामध्ये शेतकरी जनावरांना विविध प्रकारचा हिरवा चारा, सुका चारा, विविध प्रकारचे पशुखाद्याचा वापर करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
calcium benifit to animal health

calcium benifit to animal health

पशुपालन व्यवसायामध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल तर जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. तर आपण जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाचा विचार केला तर ते बर्‍याच अंशी जनावरांच्या एकंदरीत आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. आहारामध्ये शेतकरी जनावरांना विविध प्रकारचा हिरवा चारा, सुका चारा, विविध प्रकारचे पशुखाद्याचा वापर करतात.

परंतु आपण देत असलेल्या आहाराच्या माध्यमातून जनावरांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा कितपत पुरवठा होतो हे देखील पाहणे गरजेचे आहे.

कारण मानवी शरीराप्रमाणे जनावरांना देखील विविध प्रकारच्या महत्त्वाच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. या पोषक घटकांचा विचार केला तर यामध्ये कॅल्शियम देखील तितकेच जनावरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे महत्त्व व आरोग्य या बद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा

 जनावरांच्या आरोग्य आणि कॅल्शियम

 आपल्याला माहित आहेच कि कॅल्शियमचा आणि हाडांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. जर आपण पशूंचा विचार केला तर जनावरांचे हाडे व दातांच्या तसेच वाढीव दूध उत्पादनासाठी कॅल्शियम खूप गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  रक्त गोठविण्यासाठी देखील कॅल्शियम आवश्यक आहे.

जर पशूंमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर जनावरांमध्ये ओस्टिओमलेसिया आजार होण्याची शक्यता असते. एकंदरीत आपण जनावरांच्या शरीराचा विचार केला तर त्यांच्या शरीरात एक टक्का एवढे कॅल्शियम असते व उरलेले 99% कॅल्शियम हे त्यांच्या दातांमध्ये व हाडांमध्ये असते. शरीरामधील रक्तात आणि मऊ पेशीमध्ये हे साठवले जाते.

नक्की वाचा:Animal Care: 'हे' घरगुती उपाय करा आणि मिळवा मुक्तता जनावरांच्या कासदाह आजारापासून

जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये कॅल्शियम महत्त्वाचे असून हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून याची गरज भागवली जाते. 

हिरव्या चाऱ्यामध्ये द्विदल चारा हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे.कॅल्शियम हे मांस पेशी व मज्जासंस्था वर नियंत्रण करते. त्यासोबतच शरीरामध्ये आवश्यक विकरे तयार होण्यासाठी याची मदत होते. त्यासोबतच जनावरांमधील पाण्याचे संतुलन करण्याचे महत्वाचे कार्य कॅल्शियममुळे पार पडते.

कॅल्शियमची कमतरता असेल तर कसे होतात परिणाम?

 ज्या जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दूध उत्पादन कमी होण्याची समस्या निर्माण होते तसेच जनावरांची वाढ खुंटते. जनावरांची हाडे ठिसूळ होतात. लहान वासरांमध्ये म्हणजेच लहान जनावरांत मुडदूस हा आजार होतो. जनावरांच्या चारा खाण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे जनावरांचे आहार व्यवस्थापन करताना कॅल्शियमच्या व्यवस्थित पुरवठा कडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Fodder Management: 'हे'3 प्रकारचे गवत म्हणजे दूध उत्पादनवाढीची हमखास खात्री, वाचा माहिती

English Summary: calcium and animal health is realted to eachother so provide adquate calcium to animal Published on: 27 September 2022, 12:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters