शेतकरी मित्रांनो जर आपण देखील शेती व्यवसायासोबत शेतीपूरक व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो खरे पाहता आजच्या या महागाईच्या काळात केवळ शेती क्षेत्रावर किंवा शेतीतून मिळत असलेल्या उत्पन्नावर उदरनिर्वाह भागवणे म्हणजे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात मोठा अमूलाग्र बदल करावा लागणार आहे.
कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी आता शेतीपूरक व्यवसाय करण्याची काळाची गरज बनली आहे. यामुळे आज आपण देखील शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी एका भन्नाट शेतीपूरक व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण कडकनाथ कोंबडी पालन या शेतीपूरक व्यवसाय विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ ना दवडता जाणून घेऊया या विषयी.
मित्रांनो कडकनाथ जातीची कोंबडी संपूर्ण काळ्या कलरची असते. या कोंबडीच्या मांसात तसेच अंड्यात अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने या कोंबडीने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. या कोंबडीचा सर्वाधिक व्यवसाय हा आपले शेजारील राज्य मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातील आदिवासी भागात या कोंबडीला कालीमासी म्हणुन ओळखले जाते. त्याचे मांस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कडकनाथ कोंबडीला त्याच्या औषधी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे.
Pm Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना नाही मिळणार 2 हजार; यादीत 'या' पद्धतीने तपासा तुमच नाव
कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय आता फक्त मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पुरताच मर्यादित राहिलेला नाही. याचा व्यवसाय आता देशातील इतर अनेक राज्यांमध्ये केला जात आहे. आपल्या राज्यातही कडकनाथ कोंबडी पालन आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची कृषी विज्ञान केंद्रे कडकनाथ कोंबडीची पिल्ले वेळेवर ग्राहकांना पुरवू शकत नाहीत, यावरून तुम्ही या व्यवसायाच्या व्याप्तीचा अंदाज लावू शकता. कडकनाथ कोंबडीची उत्पत्ती मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात झाली, त्यामुळे मध्य प्रदेशातील या कडकनाथ कोंबडीला जीआय टॅग मिळाला आहे. या टॅगचा अर्थ असा की येथे मिळणाऱ्या कडकनाथ कोंबड्यासारखा दुसरा कोंबडा नाही.
काजुची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! वाचा काजूच्या शेतीविषयी काही महत्वाच्या टिप्स
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कडकनाथ कोंबडीचा रंग काळा, मांस काळा आणि रक्त देखील काळ असते. औषधी गुणधर्मामुळे याची आता मागणी वाढू लागली आहे. या कोंबडीच्या मांसात लोह आणि प्रथिने खूप जास्त असतात. त्याच्या मांसामध्ये चरबी देखील असते. त्यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचे चिकन खूप फायदेशीर आहे.
याच्या नियमित सेवनाने शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळू लागतात. त्याची मागणी आणि फायदे लक्षात घेऊन सरकारही त्यांच्या स्तरावर त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू लागले आहेत. निश्चितच कडकनाथ कोंबडीची मागणी लक्षात घेता शेतकरी बांधवांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे.
Post Office Scheme: एकदा गुंतवणूक करा आणि कमवा 59 हजार 400 रुपये; वाचा या योजनेविषयी
Share your comments