Business Idea: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) व शेतीपूरक व्यवसाय (Agri Business) केले जातात. अलीकडे आपल्या देशाच्या ग्रामीण भागात आधुनिक पद्धतीने शेती व कमी खर्चात जास्त फायदे देणारे शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (Farmer) करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या राज्यात देखील शेतकरी बांधव आता फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत.
शेतकरी बांधव शेतीपूरक व्यवसायात पशूपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत असतात. पशुपालनात कुकूटपानास शेतकरी बांधव अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. मात्र जर शेतकरी बांधवांनी बटेर पालन केले तर त्यांना अधिक नफा मिळेल असा दावा कृषी तज्ञ करत असतात. बटेर पालन हा एक असा व्यवसाय आहे जो की कमी खर्चात सुरू करता येतो आणि अवघ्या 35 दिवसात या व्यवसायातून कमाई सुरू होते. अशा परिस्थितीत बटेर पालन हा व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी वरदान सिद्ध होऊ शकतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया बटेरपालन या शेतीपूरक व्यवसायातील काही महत्त्वाच्या बाबी.
पोल्ट्रीपेक्षा कमी खर्चात सुरु होतो व्यवसाय:- कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कुक्कुटपालनापेक्षा बटेरपालन हा शेतीपूरक व्यवसाय कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येतो. त्यामुळे या व्यवसायाकडे शेतकरी बांधव झपाट्याने वळत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता कोंबड्यांच्या देखभालीसाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात, मात्र बटेर पाळण्यात अधिक श्रम घ्यावे लागत नाही. या पक्ष्याचा लहान आकार असतो शिवाय वजन देखील कमी असते यामुळे अन्न कमी लागते आणि जागा देखील खूपच कमी लागते.
एकंदरीत काय अन्न आणि जागा कमी लागत असल्यामुळे व्यवसायात गुंतवणूक देखील खूपचं कमी आहे. मात्र असे असले तरी, शिकारीमुळे बटेर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत दक्षता घेत सरकारने बटेर पालनाबाबत नियम लागू केला आहे. ज्या व्यक्तीला या पक्ष्याचे पालन करायचे असेल त्यांना यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. परवाना घेऊन निश्चितच शेतकरी बांधव या व्यवसायातून चांगली कमाई करू शकणार आहेत.
एक हजार बटेर आणून व्यवसाया सुरु करा:- शेतकरी मित्रांनी जर आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण एक हजार बटेर पक्षी आणून या व्यवसायाची सुरुवात करू शकता. जर आपण एक हजार बटेर पक्षी आणत असाल तर आपल्याला 50 हजार रुपये या व्यवसायासाठी इन्वेस्ट करावे लागणार आहेत. 50 हजार खर्चून 1000 बटेर पक्षी पालन सुरू करता येणार आहे. या पक्ष्याचे पालन करून आपण 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न दर महिन्याला सहजपणे कमवू शकता. तुम्ही तुमचा व्यवसाय जसजसा मोठा करत जाल तसतसा तुमचा नफा आणि उत्पन्न देखील वाढणार आहे.
लाखोंचा नफा कमवू शकता:- जाणकार लोकांच्या मते, मादी बटेर पक्षी एका वर्षात सुमारे 300 अंडी घालतात. बहुतेक बटेर त्यांच्या जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत अंडी घालू लागतात. खरं पाहता बाजारात बटेरच्या मांसाला चांगली मागणी असते. 30 ते 35 दिवसांत, बटेर 180 ते 200 ग्रॅमचे होतात. अशा स्थितीत ते बाजारात विकले तर चांगला नफा मिळतो. एक लहान पक्षी 50 ते 60 रुपयांना सहज विकला जातो. निश्चितच जर शेतकरी बांधवांनी बटेर पालन चांगल्या पद्धतीने केले तर त्यांना वर्षाला लाखोंचा नफा मिळणार आहे.
Share your comments