शेती आणि खाते या एकमेकांशीघनिष्ठ संबंध असलेल्या दोन बाजू आहेत. शेतीला जितके उत्कृष्ट बियाणे ची आवश्यकता असते त्या प्रमाणात उत्कृष्टप्रकारचे खत हे महत्त्वाचे असते.परंतुशेतीमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचा विपरीत परिणाम हा जमिनीवर, पिकांवर, उत्पन्नावर पाहायला मिळतो. रासायनिक खताचे हे तोटे ओळखून बरेच शेतकरी आता सेंद्रिय खतां कडे वळत आहेत. सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते व उत्पन्न वाढते.तसेच जमिनीवर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम दिसून येत नाही. या लेखात आपण लेंडीखत विषयी जाणून घेणार आहोत.
लेंडीखत
सेंद्रिय खत म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते गाई-म्हशींचे शेणखत व दुसरे म्हणजे शेळ्यांचे लेंडीखत हे होय.परंतु या दोन खतांच्या मध्ये शेतकरी शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसतात. कारण लेंडीखत च्या तुलनेत शेणखतामध्ये चाऱ्याचे शिल्लकअवशेष तसेच इतर घरगुती कचरा वगैरे जास्त प्रमाणात नसतो. करतो लेंडी खताचे गुणधर्म जाणून घेतले तर लेंडीखत किती फायदेशीर आहे हे कळतं.
लेंडी खताचे विशेष महत्त्व
शेणखताच्या तुलनेत लेंडीखत याचा विचार केला तर लेंडीखत यामध्ये जलधारण क्षमता अधिक असते. सुकलेली लेंडी ही टणक असल्यामुळे लवकर फुटत नाही त्यामुळे उन्हाळा भर शेतात जशीच्यातशी राहू शकते. पावसाळ्यामध्ये लेंडी पाणी शोषून घेते व त्याचे आकारमान पहिल्यापेक्षा अधिक मोठा झालेला दिसून येतो.लेंडी च्या वाढलेल्या आकारमानात केवळ पाणीच असल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते. लेंडी मधील पाणी हळूहळू पिकास उपलब्ध होत राहते व त्याचसोबत लेन्डीमधील अन्नद्रव्ये ड्रीपर प्रमाणे पिकास उपलब्ध होतात. ज्या शेतात लेंडीखत वापरलेले असते त्या शेतातील पिके कमी पाणी वापर या पावसामुळे शक्यतो बळी पडत नाहीत.
लेंडी खताच्या कमी उपलब्धतेमुळे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात व्यापारी पिकांमध्ये करणे शक्य होतनाही. परंतु कापूस, सोयाबीन, इतर भाजीपाला पिके, चारा पिकांना याचा उपयोग करता येतो.
शहरी भागांमध्ये कुंड्यांमधील शोभेच्या झाडांसाठी लेंडीखताचा वापर करण्याला लोकांची पसंती दिसतो. लेंडीखतला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध असून सरासरी 16 ते 30 रुपये किलो पर्यंत या दराने ते विकले जाते.तसेच कोंबड्यांच्या खुराडा मध्ये लहान पिलांना व मिळावी म्हणून तसेच शेतात शेतमालाचे रानटी जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी धूरनिर्मिती साठी लेंडी खताचा वापर होतो.
लेंडी खत साठवताना त्यात चार याचे औषध जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच चारा देण्यासाठी गव्हाण वा तत्सम चारा पात्रांचा उपयोग करावा. बारीक बी असलेला परिपक्व चारा शेळ्यांना खायला देऊ नये.
Share your comments