1. पशुधन

सावधान हवेतून बर्ड फ्लू चे भारतावर दुहेरी संकट

आता कुठे भारत कोरोना रोगातून थोडा मोकळा श्वास घेत असताना हे मोठे संकट दाराशी येऊन ठेपले आहे.एकीकडे कोरोनाच्या लसीची तयारी सुरु आहे आणि दुसरीकडे नवीन रोग आक्रमण करायला दबा धरून बसला आहे. एच ५ एन १ हा विषाणू पक्षांमधून पक्षांमध्ये तसेच तो पक्षांमधून माणसांमध्ये देखील पसरतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
bird flu

bird flu

आता कुठे भारत कोरोना रोगातून थोडा मोकळा श्वास घेत असताना हे मोठे संकट दाराशी येऊन ठेपले आहे.एकीकडे कोरोनाच्या लसीची तयारी सुरु आहे आणि दुसरीकडे नवीन रोग आक्रमण करायला दबा धरून बसला आहे. एच ५ एन १ हा विषाणू पक्षांमधून पक्षांमध्ये तसेच तो पक्षांमधून माणसांमध्ये देखील पसरतो.

दरवर्षी ह्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि दुर्दैवाने त्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरते त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते अंडी तसेच मांस खाऊ कि नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत येतात. हा रोग देशातील चार राज्यांमध्ये हा रोग वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांमध्ये दिसून आला आहे. उदा कावळे, कोकिळा, मोर,परदेशी पक्षी, बदके इत्यादी.

मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश मध्ये कावळ्याततर केरळ मध्ये बदक आणि राजस्थान मध्ये कोंबड्यांमध्ये हा रोग दिसून आला आहे. खव्वयांनी चिकन आणि अंडी चिकन ९०-१०० अंश सेल्सिअसला शिजवल्यास बर्ड फ्लू चा विषाणू निष्क्रिय होतो. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही तसेच अंडी आणि मांस थांबवण्याचे काही कारण नाही. फक्त अन्न शिजवण्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क राहावे.तसेच  पोल्ट्री व्यवसायिकांनी आपल्या शेडवर विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

अ) बर्ड फ्लू कोणाला होतो ?

  1. बर्ड फ्लू हा स्थलांतरित पक्षांमार्फत सर्वच पक्षांना तसेच प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या प्राण्यांना होऊ शकतो.
  2. हा रोग खूपघातक तसेच हानिकारक मानला जातो. मानव संक्रमित पक्ष्यांच्या पंख,लाळ,विष्ठा,तसेच मृत पक्षी यांच्याशी संपर्क आला असेल तर त्याची लागण होऊ शकते.
  3. हा रोग काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्ये होऊ शकतो उदा, कुत्रा, मांजर. त्यामुळे कुत्रा, मांजर यांना संक्रमित भागात जाण्यास रोखणे खूप महत्वाचे ठरते

 

ब) मानवांमध्ये आढळणारी लक्षणे-

१) तापासह शरीर आखडणे

२) खोकला किंव्हा कप जमा होणे.

३) डोळे जळजळणे

४) शारीरिक वेदना  थकवा जाणवणे. 

५) डोकेदुखी, तसेच जुलाब होणे   

६) पोटदुखी तसेच घश्याला सूज येणे तसेच डोळ्याला रांजणवाडी  .

७) सर्दी होणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी.

हेही वाचा:कोंबड्यांच्या 'या' समस्येमुळे महाग झाली अंडी ? वाचा सविस्तर माहिती

क) खबरदारीच्या उपाययोजना-

  1. आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे.

  2. गजरजेनुसार सॅनिटायझर चा वापर करावा.

  3. संक्रमित पक्ष्यांपासून दूर राहा.

  4. अन्न चांगले शिजवा तसेच स्वच्छता राखा.

  5. इतर राज्यातील मांस खाणे शक्यतो टाळावे .

  6. तोंडावर रुमाल किंव्हा मास्कचा वापर करावा.

  7. मृत पक्षी आढळून आले तर पीपीई किटचा वापर करून ते पक्षी दूर ठिकाणी जाळून टाकावेत.

  8. गाव पातळीवर स्वच्छता बाळगावी.

  9. पोल्ट्री पालकांनी शेडवर दिवसातून २-३ वेळा जंतुनाशक स्प्रे घ्यावेत.

  10. मोठ्या पोल्ट्री पालकांनी मेलेल्या पक्ष्यांचे त्या ठिकाणी शवविच्छेदन न करता अधिकृत प्रयोगशाळेत त्याचे निदान करावे.

  11. पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या कामगाराशिवाय नवीन व्यक्तींना प्रतिबंध घालावा जेणेकरून विषाणूजन्य रोगाचा प्रसार टाळता येतो.

 

प्रा.नितीन रा. पिसाळ

प्रशिक्षक, (स्किल इंडिया प्रोजेक्ट)

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.

मो.नं- 8007313597; ई-मेल-nitinpisal2312@gmail.com

         

English Summary: Be careful Airborne bird flu double crisis on India Published on: 14 January 2021, 04:00 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters