जर शेळीपालन व्यवसायाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहेच की, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा आणि हमखास चांगला नफा राहील असा हा व्यवसाय आहे. जर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय करायचा राहिला तर सगळ्या प्रकारचे व्यावसायिक बारकावे तसेच व्यवस्थापनातील बारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतातच.
परंतु शेळीपालनातील यशाची पहिली सुरुवात होते ती शेळ्यांच्या जातींची निवड यावरून होय. सहाजिकच आहे की जातिवंत शेळीच्या जातींची निवड केली तर या शेळ्या पासून मिळणारे उत्पादन देखील चांगले मिळते.
त्यामुळे शेळ्यांच्या ज्या काही जाती आहेत, त्यामधून योग्य जातींची निवड करणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण शेळीच्या एका महत्त्वपूर्ण आणि चांगल्या उत्पादनक्षम जातीची माहिती घेणार आहोत.
बारबेरी जातीची शेळी देईल चांगले उत्पादन
जर आपण शेळीपालनाचा विचार केला तर कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची योजना असेल तर बारी जातीची शेळी तुमच्या साठी खूप महत्त्वाची ठरू शकते. जवळजवळ 11 महिन्यात ही शेळी प्रजननाला तयार होते.
या शाळेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी जास्त करून दोन किंवा तीन करडांना जन्म देण्यास सक्षम आहे. जर या शेळी बद्दल अधिक माहिती घेतली तर ही आफ्रिकेतील बार्बरा या ठिकाणाहून भारतात आणली गेली असून तिला बारबरी असे नाव पडले आहे.
तसेच ज्या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही थंड आणि उष्ण अशा दोन्ही हवामान प्रकारात चांगली तग धरते व वाढते. माती शेळीचे वजन 20 ते 30 किलोपर्यंत असते व दररोज एक लिटर दूध देण्याची क्षमता आहे. बारबरी जातीची शेळी खूप वेगाने विकसित होते व तिच्या उत्तम प्रजननक्षमतेमुळे एका वर्षात कळपातील शाळांच्या संख्येत चांगलीच वाढ होते.
मांस उत्पादनासाठी ही शेळी खूप महत्त्वाचे आहे. बारी जातीचा बोकड आणि बकरीच्या मांसाला बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे शेळी पालन करणारे शेतकरी या जातीच्या शेळ्या पालन करून चांगला नफा मिळवू शकता.
Share your comments