1. पशुधन

Fish Farming: शेतकरी बंधूंनो! नेमकी काय आहे एकात्मिक मत्स्यशेतीची संकल्पना? शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

भारत हा कृषीप्रधान देश असून भारताचे बहुसंख्य लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारचे जोडव्यवसाय शेतकऱ्यांनी केली तरच शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतीला पूरक अशा जोडधंद्यांचा जर आपण विचार केला तर ते शेतीला पूरक अशी असून शेतातील काही बाबींचा उपयोग या जोड धंद्यासाठी करता येतो

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
integreted fish farming

integreted fish farming

भारत हा कृषीप्रधान देश असून भारताचे बहुसंख्य लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारचे जोडव्यवसाय शेतकऱ्यांनी केली तरच शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतीला पूरक अशा जोडधंद्यांचा जर आपण विचार केला तर ते शेतीला पूरक अशी असून शेतातील काही बाबींचा उपयोग या जोड धंद्यासाठी करता येतो

या बाबतीत जर आपण मत्स्यपालनाचा विचार केला तर शेतीला जर मत्स्य पालनाची जोड दिली तर शेतकरी बंधूंना खूप चांगला फायदा होऊ शकतो.

जर आपण एकात्मिक शेती पद्धतीचा विचार केला तर यामध्ये मत्स्यपालनातून खूप चांगला नफा शेतकऱ्यांना मिळणे शक्य आहे. यामध्ये आपण शेती आणि मत्स्य व्यवसाय हे एकमेकांच्या सोबत कसे करता येऊ शकतात याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ

 एकात्मिक मत्स्यशेती

1- भाताच्या शेतीसोबत मत्स्यपालन- जर आपण या पद्धतीचा विचार केला तर यामध्ये भात शेती सोबत मत्स्य शेती केली जाते. परंतु यामध्ये सर्व प्रकारच्या भाताच्या जाती या एकात्मिक मत्स्यशेतीसाठी चांगल्या नाही. यासाठी  पाणीधान, तुळशी, 

राजराजन आणि एडीटी 7 यासारख्या जातींची निवड करणे आवश्यक आहे. आणि भात शेतीमध्ये माशांचा प्रजातींची निवड करायची असेल तर यासाठी कॉमन कार्प आणि मुरेल्स यासारख्या जातींची निवड करू शकतात.

2- फलोत्पादन आणि मत्स्यशेती- या प्रकारामध्ये तलावाचे बांधकाम आणि लगतच्या भागांचा बागायती पिकांसाठी उत्तम वापर करणे शक्य असून वरच्या, बाहेरील आणि आतील डाईक्समध्ये नारळ, आंबा आणि केळी सारख्या पिकांची लागवड करावी

आणि जमिनीच्या बाजूला अननस, हळद आणि मिरचीची लागवड करणे शक्‍य असून या माध्यमातून जे काही पाण्याची देवाण-घेवाण होईल त्याचा वापर झाडांना पाणी देण्यासाठी करता येतो. यातील भाजीपाल्याचे अवशेष तलावातील माशांना द्याव्यात व याचा फायदा ग्रास कार्पसारख्या माशांना होतो.

नक्की वाचा:हिरवा चारा नाही, नो टेन्शन! हिरव्या चाऱ्याला चांगला पर्याय ठरणार अझोला; दुधाचे उत्पादन वाढणार

3- रेशीम शेती मत्स्यपालनाचे एकात्मिक शेती- या पद्धतीमध्ये माशासोबत रेशीम कीटक संवर्धन करणे शक्य आहे. यामध्ये तुतीची पाने प्रामुख्याने रेशीम कीटक खातात आणि रेशीम किड्यांची जि विष्टा असते ती मत्स्य तलावात टाकली जाते. यामुळे माशांच्या तलावातील नैसर्गिक अन्न वाढते.

4- अळींबी आणि मासे एकात्मिक शेती- या प्रकारामध्ये अळींबी लागवडीसाठी  काही उच्च आद्रतेची आवश्यकता असते त्यामुळे मत्स्यपालनासह त्याची लागवड करता येते.

जर आपण भारतातील व्यावसायिक संवर्धित अळींबीच्या जातीचा विचार केला तर यामध्ये व्होलोरियला एसपीपी यासारख्या जाती महत्त्वाचे आहेत.

नक्की वाचा:Goat Rearing: 'अशा पद्धती'चे व्यवस्थापन कराल तर शेळीपालनात वाचेल खर्च वाढेल नफा, वाचा डिटेल्स

English Summary: integreted fish farming concept is benificial for farmer get double income Published on: 06 October 2022, 05:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters