शेळी हा अतिशय उपयुक्त असणारा प्राणी मानवाने सर्वप्रथम हाताळला आहे. भारतातील शेतकऱ्यांना आवश्यक साहाय्यभूत उद्योगांपैकी शेळीपालना सर्वात जास्त नफा असलेला तसेच जास्त जबाबदारी नसलेला उद्योग आहे. मधमाशी पालन, कुकुट पालन इत्यादी सहाय्यभूत उद्योगांमध्ये सहज, जादा जबाबदारी नसलेला आणि सर्वात जास्त नफा देणारा शेळीपालन उद्योग हा सध्या व्यावसायिक स्वरूपात आणणे सहज शक्य असूनही हा प्राणी दुर्लक्षित राहिला आहे.
शेळीपालन हा आर्थिक दृष्ट्या कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. जातिवंत शेळ्यांची कमी वेळात जास्त वजन वाढ होते तसेच शेळीच्या मांसाला बाजारात चांगली मागणी आहे. या लेखात आपण उपयुक्त अशा या शेळीपालन व्यवसायासाठी कृत्रिम रेतन किती फायद्याचे आहे हे जाणून घेणार आहोत.
कृत्रिम रेतनाचे फायदे
- नैसर्गिकरित्या जर आपण शेळ्या फळवल्या तर एका बोकडा पासून एकच शेळी फळवली जाते आणि जर आपण कृत्रिम रेतनाद्वारे फळवली तर एका बोकडा पासून दहा ते बारा शेळ्या फळवता येतात.
- एकत्रित माज नियंत्रण करून कृत्रिम रेतनानेशेळ्या फळवल्या तर गर्भधारणेचे प्रमाण वाढते आणि एकाच वेळी विक्रीसाठी बोकड तयार करता येतात.
- कृत्रिम रेतन हे तंत्र वापरून सुधारित जातीच्या बोकडाच्या वीर्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो. विशेषतः आजच्या पशुपालकांना आपल्या जनावरांमध्ये संकरीकरणा द्वारे सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारित जातीचे नर पाळण्याची कुवत नसते. त्यांच्यासाठी कृत्रिम रेतन तंत्र हे एक वरदान आहे.
- एखादा बोकड नैसर्गिक संकरा साठी वापरल्यास त्याच्यापासून वर्षाला 40 ते 50 करडांचे पैदास होत असेल तर त्या नरापासून वर्षाला तीन हजार वीर्यमात्रा उपलब्ध होतात.
- त्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतनाद्वारे फलितचे प्रमाण जरी 30 ते 35 टक्के मिळाले तरी त्यापासून अंदाजे एक हजार सुधारित संकरित करडांची पैदास होऊ शकते.
कृत्रिम रेतनासाठी बोकडाची निवड कशी करावी?
एकाच बोकडाचा सारख्या संकर झाल्यामुळे खेडेगावातील शेळ्यांचा दर्जा खालावत जात आहे व नीपजणारी करडे उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने फारच निकृष्ट असल्याचे जाणवते. याचे आणखी एक कारण म्हणजे कोणी पाळलेला बोकड एखादा चांगला व जोमाने वाढणाऱ्या बोकड असला तर तो लवकर कत्तलीसाठी योग्य होतो व आर्थिक कारणास्तव अशा बोकडाची कत्तल होते. त्यामुळे पैदाशीसाठी उपलब्ध असलेला बोकड चांगल्या दर्जाचा नसतो. म्हणूनच कृत्रिम रेतनाद्वारे इन ब्रीडींगटाळण्यासाठी वीर्य उपलब्ध करणाऱ्या केंद्रांनी पुरेशा संख्येमध्ये एकमेकांशी नाते संबंध नसलेले नर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे
- कृत्रिम रेतन करण्यासाठी शक्यतो त्या जातीच्या नराचे वजन वाढ झपाट्याने होते त्या जातीच्या नराची वीर्य कांडी वापरावे.
- कृत्रिम रेतन यामुळे सशक्त करडे जन्माला येतात त्यामुळे मरतुकीचे प्रमाण कमी राहते.
- नैसर्गिक संकरासाठी एकाच नराचा अनेक माद्याशी संपर्क येतो.
- यामधून नवरा कडून मादीला व मादीकडून नराला प्रजनन संस्थेच्या सांसर्गिक रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता असते कृत्रिम रेतनाद्वारे ती टाळता येते.
- जेव्हा शेळ्यांचा माजाचाहंगाम नसतो त्यावेळेस नैसर्गिक संकरासाठी नर अनुत्सुक असतो आणि त्याच्या वीर्याची प्रत देखील खालावते. अशा वेळेस गोठवलेले वीर्य कृत्रिम रेतन उपयुक्त ठरते.
- शेळ्यांमधील जनुकीय सुधारणा आणि शेळ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्य विस्तारित करण्याचा हेतू आहे.
Share your comments