भारत हा कृषीप्रधान देश आहे जे की शेतकरी आपल्या शेतीमध्ये पारंपरिक पिकाबरोबरच आधुनिक पिके सुद्धा घेत आहेत मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे तसेच कमी उत्पादन निघाले तर बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते मात्र बाजारभाव पण मिळत नसल्याने शेतकरी आता पशुपालन कुक्कुटपालन व्यवसायकडे वळत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत:
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार लोकांना तसेच पशुपालक बांधवांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करत आहे. पशुसंवर्धन विभाग अंतर्गत युवा पिढी तसेच शेतकरी वर्गाला वैयक्तिक लाभ भेटावे त्यासाठी ज्या योजना सुरु केल्यात त्यासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत.ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत तसेच जे लाभार्थी आहेत त्यांची निवड करण्याची पद्धत सुरू झाली आहे. याचबरोबर जिल्हास्तरीय योजनांसाठी सुद्धा विविध योजना लागू करण्यात आलेल्या आहेत.
दरवर्षी लाभार्थी वर्गाला पुन्हा सारखे सारखे फॉर्म भरण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून शासनाने ५ वर्षांसाठी प्रतीक्षा यादी ठेवण्याची सोय केली आहे त्यामुळे आता लाभार्थी वर्गाला जे की पशुपालक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. आता यादीतील क्रमांकानुसार लाभ कधी मिळणार आहे याचा अंदाज लाभार्थ्यांना समजणार आहे जे की यामुळे नियोजन करता येणार आहे.
राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट वाटप करणे, गाई- म्हशींचे गट वाटप करणे, संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस सहाय्य देणे, २५३ तलंगा गट वाटप तसेच १०० कुकट पिलांचे वाटप इ. सर्व योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने २०२०-२१ साठी निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. पशुपालक वर्गाला डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबी पाहिजेत त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे जे की त्यासाठी निवड करण्याची सुविधा सुद्धा प्राप्त करून दिली आहे. राज्यातील शेतकरी बांधव, पशुपालक तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती याना या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आवाहन करत आहे.
Share your comments