आज काल दुग्धव्यवसायात तंत्रज्ञान खूप पुढे गेले असले तरी बहुतांशी लोक हे दुग्धव्यवसाय पारंपरिक पद्धतीने करत असल्याने त्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच नाविन्यपूर्ण बाबी माहित नसल्याने त्यांच्या दुग्धव्यवसायात वाढही होत नाही आणि दुग्धव्यवसाय फायद्याचा की तोट्याचा हे देखील समजत नाही. दुग्धव्यवसायात खुप भांडवल लागते त्यामुळे हा व्यवसाय करत असताना एक जरी चुकीचे पाऊल पडले तर त्याचा खूप मोठा तोटा शेतकरी बांधवांना सहन करावा लागत असतो.
त्यामुळे हा तोटा होण्याच्या अगोदरच त्यासंबंधीची काळजी घेऊन नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची दुग्ध व्यवसायात अंमलबजावणी केल्यास शेतकरी बांधवांना येणाऱ्या तोट्याला सामोरे जावे लागत नाही. शेतकरी बांधवांचा ७० ते ८०% हा खर्च हा चारा व खाद्य व आजार व्यवस्थापनावरती होत असतो त्यामुळे तो खर्च कमी करण्यासाठी व्यवस्थापन हा एकमेव पर्याय शेतकरी बांधवांपुढे उरलेला आहे. याच अनुषंगाने दुग्धव्यवसायातील शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आधुनिक दुग्धव्यवसायाची सखोल माहिती घरबसल्या मिळावी, हा उद्देश आहे.
याच उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने धेनू अँप विकसित करून शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय सल्ला व तज्ञांचे मार्गदर्शन, पशु ज्ञान, पशु बाजार, जनावरांच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी खास पशु व्यवस्थापन हा स्वतंत्र विभाग दिलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची नोंदणी केली तर व्यवस्थापन तर सुलभ होईलचं परंतु पशुपालकांच्या चुकांमुळे होणारे तोटे देखील कमी होण्यास खुप मदत होणार आहे.
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
धेनू ॲप मधील व्यवस्थापन विभागाची खास वैशिष्ट्ये-
१) गोठ्यातील सर्व जनावरांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवता येतात तसेच डिजिटली संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन करता येते.
२) जनावरांच्या वाढीची स्थिती जस जशी बदलत जाईल तस तशा व्यवस्थापनाच्या अधिसूचना पशुपालकाला मिळत जातात.
३) जनावराला कोणत्या महिन्यात कोणते लसीकरण कधी करावे? या संबंधितच्या अधिसूचना मिळतात.
४) जनावर कधी माजावर येईल? कधी भरावे? तसेच
गर्भधारणा तपासणी कधी करावी या संबंधितच्या अधिसूचना मिळतात.
५) जनावर कधी विणार? तसेच ते कधी आठवावे
या संबंधितच्या अधिसूचना मिळतात.
६) व्यवस्थापनाच्या सर्व अधिसूचनेमुळे जनावरांच्या आरोग्याचे तंतोतंत पालन करता येते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची बँक असणारे धेनू अँप हे प्ले स्टोरवरती मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाखों शेतकरी बांधव आपल्या व्यवसायात दररोज वापर करून यशस्वीरित्या वाटचाल करीत आहेत.
दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
Share your comments