भारताचा प्रमुख व्यवसाय शेती असून बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालन त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. परंतु बऱ्याच वेळेस नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, पूर, विजा पडणे इत्यादी कारणांमुळे जनावरे दगावतात.
तसेच एखाद्या गंभीर आजारामुळे देखील जनावरे मृत्यू पावतात. त्यामुळे पशुपालकांना जबर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.यासाठी सरकारने पशुधन विमा योजना आणली आहे. या योजनेमध्ये जनावरांच्या मृत्यूमुळे नुकसानीची भरपाई करून सरकार गुरांच्या मालकांना आर्थिक मदत देते
या योजनेद्वारे विमा कसा काढावा?
या योजनेअंतर्गत विमा काढण्यासाठी सर्वप्रथम जनावरांच्या मालकांना त्यांच्या जिल्ह्याच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात विमा काढणे बाबत संपूर्ण माहिती द्यावी लागते.
त्यानंतर तेथे जनावरांची आरोग्य तपासलेजाते.त्यानंतर आरोग्य प्रमाणपत्र दिले जाते. या विम्याच्या प्रक्रियेदरम्यान प्राण्यांच्या कानावर 1टेग लावला जातो.त्यानंतर पशुधन मालकांना पशु विमा पॉलिसी जारी केली जाते.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑनलाईन माध्यमातून देखील विमा मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्यातील पशुधन विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाइन विमा काढू शकता.
पशुधन विमा योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- जनावरांचामृत्यूझाल्यासपशुधन मालकांना नुकसान होत नाही.
- या योजनेअंतर्गत पशुपालकांना विमा संरक्षणाचे सुविधा पुरवली जाते.
- या योजनेद्वारे पशुपालक सर्व प्राण्यांचा विमा उतरवू शकतात.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे विमा हप्त्याचीवेगळी रक्कम
या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रीमियम भरण्याची वेगवेगळी रक्कम आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर उत्तर प्रदेशातील गाय किंवा म्हशीचे पन्नास हजार रुपयांच्या विमा संरक्षणासाठी प्राण्यांच्या जातीनुसार प्रीमियमची रक्कम 400 ते हजार रुपयांपर्यंत असते.( संदर्भ-mhlive24.com)
Share your comments