पशु बद्दलची सर्व माहिती मिळेल e- Gopala APP वर ; जाणून घ्या App चे फिचर्स

21 September 2020 01:49 PM


केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी  अनेक प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे,यासाठी सरकार पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देत आहे. यावर काम करताना सरकारने पशुपालकांना आता डिजिटल पातळीवर आण्याचा प्रयत्न करत ई-गोपाला एप लॉन्च केले आहे. पशुपालकांचे उत्पादन वाढविण्यासाठी या एपचा उपयोग होईल,असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.  दरम्यान हे एप पंतप्रधान मोदींनी १० सप्टेंबर २०२० रोजी लॉन्च केले आहे.

ई- गोपाल एप हे आपण गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतो. आपल्या मोबाईल नंबरवरुन या एपवर नोंदणी करू शकतो. दरम्यान आपल्या समोर सहा पर्याय येतील. यात सर्वात आधी पर्याय दिसेल पशु आहाराचा. यात आपल्याला पशु आहाराविषयी पुर्ण माहिती मिळेल. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा पर्यायात आपल्याला जनावरांच्या रोगांची माहिती त्याचे उपचाराविषयी पुर्ण माहिती असेल. मेरा पशु आधार या पर्यायात शेतकरी सर्व जुन्या नव्या जातीच्या जनावरांची माहिती घेऊ शकतात.

काय आहे ई-गोपाल एप –

एक चांगल्या जातीच्या जनावरांची माहिती देणारे एक डिजिटल व्यासपीठ आहे. यात आपल्याला कृत्रिम गर्भधारण, पशुंची प्राथमिक चिकित्सा, लसीकरण, उपचार आणि पशु पोषण इत्यादीविषयीची माहिती या एपमधून मिळते. याशिवाय शेकऱ्यांसाठी सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहितीही या अॅपमधून मिळणार आहे.

अलर्ट मेसेजमधून कळणार लसीकरणाची माहिती

अलर्ट पर्यायामध्ये पशुपालक आपल्या पशुंच्या लसीकरणाविषयी माहिती मिळवू शकतील. लसीकरण आपल्या जवळील कोणत्या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये चालू आहे. किंवा लसीकरण कॅम्प कुठे याची माहिती आपल्याला यातून मिळेल. कृत्रिम गर्भधारणा पद्धती आणि चांगल्या जातीच्या जनावरांचे वीर्य सीमेन विक्रीची माहिती पशुपालकांना यातून मिळणार आहे.

E-Gopala App e-Gopala app features केंद्र सरकार central government ई-गोपाला एप पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi पशु संवर्धन animal husbandry
English Summary: All the information about animals can be found on the e-Gopala app, find out the features

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.