फवारणीतुन वापरलेला स्फुरद हा दर तासाला पिकात 1 फुट ईतक्या वेगाने प्रवास करतो. फवारणीतुन वापरलेला युरिया हा पहील्या 3 -4 तासात केवळ 30% ईतका शोषला जातो, शिल्लक 70% 24 तासांनी शोषला जातो. फवारणीतुन वापरलेली खतै ही जमिनीतुन दिलेल्या खतांपेक्षा कमी तर लागतातच पण ती 20पट अधिक फायदेशीर ठरतात. कँल्शियम चे शोषण हे पानांव्दारे फार कमी होते, त्यामुळे त्याचा वापर कमतरता असतांना वारंवार करवा. कमी जरी असला तरी कँल्शियम चे शोषण हे पानांच्या व्दारे मुळांच्या पेक्षा वेगातच होते. म्हणून कँल्शियम कमतरता ही पानांवर फवारणीतुन दुर करावी.
1) झिंक
पिकातील ऑक्झिन्स च्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे. पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इंडॉल अँसेटिक अँसिड ची निर्मिती ही झिंक पासुन होते. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अँमिनो अँसिड कार्य करते, जे झिंक च्या वापराने तयार होते.
पिकाची नत्राचे दुष्परिणाम न भोगता, शाकिय वाढ करावयाची झाल्यास झिंक व मॅग्नेशियम सल्फेट चांगले पर्याय ठरु शकतात.
झिंक हे प्रथिनांच्या निर्मितीस चालना देणा-या एन्झाईम्स ला उत्तेजित करतात. तसेच झिंक हे पिकाव्दारा निर्मित साखरेच्या वापरासाठी गरजेचे आहे. झिंक हे स्टार्च च्या निर्मितीत गरजेचे आहे. ज्यामुळे झिंक फळांच्या विकासात देखिल कार्य करित असतात.
झिंक मुळांच्या वाढीसाठी देखिल गरजेचे आहे. पिकाच्या पक्वतेवर झिंक परिणाम करते. पिकातील हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे. पिकांत उचित मात्रेत झिंक असल्यास पिक कमी तापमान सहन करु शकते.
ज्या जमिनीत झिंक चे प्रमाण कमी असते, अशा जमिनीत पिकाच्या मुळांवर हल्ला करणारे रोग यांचे प्रमाण जास्त असते. झिंक कमतरता असलेल्या पिकास मुळांवरिल रोग हे जास्त प्रमाणात होतात.
पिकाच्या मुळांव्दारा झिंक चे शोषण हे डिफ्युजन तंत्राने केले जाते. झिंक आणि कॉपर पिकांत एकाच जागेवरुन शिरत असल्या कारणाने दोघांत पिकांच्या मुळांत शिरण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. पिक झिंक हे Zn⁺⁺ च्या स्वरुपात शोषुन घेते.
झिंक जास्त सामू असलेल्या जमिनीत उपलब्ध होत नाही, मात्र हे सर्वच जमिनींवर होत नाही, झिंक सल्फेट, किंवा तत्सम अँसेडिक खतांच्या माध्यामातुन आणि मुळांच्या परिसरात झिंक देवुन हि कमतरता दुर करता येते.
जमिनीतील स्फुरद चे जास्त प्रमाण झिंक चे शोषण कमी करते.
जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिक चे चिलेशन करतात, ज्यामुळे झिंक चे कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस उपलब्धता वाढते.
पिकांस नत्राची कमतरता असल्यास साहजीकच पिकाची वाढ कमी होते, व त्यामुळे ईतर अन्नद्रव्यांची देखिल कमतरता जाणवते, ज्यात झिंक चा देखिल समावेश होतो.
मॅग्नेशियम च्या वापराने झिंक चे शोषण देखिल वाढते.
मका, कापुस, फळ पिके, मधु मका, ज्वारी, कडधान्ये, भात या पिकांस झिंक दिल्यास उत्पादनात वाढ होते.
2) फेरस(लोह)
प्रकाश संश्लेषण क्रियेत जी उर्जा निर्मिती होते, त्यासाठी फेरस अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडते. पिकातील प्रकाश संश्लेषण क्रियेत फेरस गरजेचे आहे.
हरितलवक निर्मितीत आणि त्यांच्या व्दारे प्रकाश संश्लेषण होण्यात गरजेचे आहे.
फेरस काही एन्झाईम्स आणि प्रथिनांच्या एक भाग आहे. पिकाव्दारे अन्न निर्मिती होण्यात फेरस गरजेचे आहे. ज्या पिकांच्या मुळांच्या वर नत्र स्थिर करणा-या गाठी तयार होतात त्या गाठींच्या निर्मितीसाठी फेरस ची गरज भासते.
जास्त सामु असलेल्या जमिनीत फेरस ची कमतरता जाणवते.
जमिनीत पाणी साचुन राहणे, हवा खेळती न राहणे यामुळे देखिल फेरस ची कमतरता जाणवते.
ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थींची कमी असते, अशा जमिनीत फेरस चे चिलेशन कमी होते ज्यामुळे देखिल फेरस वाया जाण्याचे व स्थिरकरणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पिकांस कमी उपलब्धता होते.
ज्या जमिनीत हवा खेळती राहत नाही त्या जमिनीत देखिल फेरस ची पिकावर कमतरता जाणवते.
जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे फेरस च्या शोषणावर विपरित परिणाम होतात.
नायट्रेट स्वरुपातील नत्राच्या वापराने देखिल फेरस च्या उपलब्धतेवर विपरित परिणाम होतात.
ज्या पिकास झिंक ची कमतरता असते त्या पिकांव्दारे फेरस चे शोषण हे जास्त प्रमाणात केले जाते.
पालाश ची कमतरता फेरसच्या शोषणास मदत करते.
कडधान्ये, बिट, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, कोबी, फुलकोबी, संत्री, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी, पालक, टोमटो हे पिके फेरस खतास जास्त प्रतिसाद देतात.
3) कॉपर
प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि उर्जा निर्मितीमधे महत्वाची भुमिका पार पाडते.
अँमिनो अँमिड चे रुपांतर प्रथिनांत करणा-या अनेक एन्झाईम्स चा एक घटक आहे.
कर्बोदके आणि प्रथिनांच्या पचनात महत्वाची भुमिका पार पाडते. कॉपर पिकाच्या पेशीतील लिग्निन निर्
मिती मधे महत्वाची भुमिका पार पाडते, ज्यामुळे पेशीस रचनात्मक शक्ती मिळते.
फळांची चव, साठवणुक क्षमता तसेच साखरेचे प्रमाण यावर परिणाम करते.
कॉपर पिकाच्या रोग प्रतिकारक शक्ती मधे देखिल कार्य करते. पुंकेसरांच्या फर्टिलीटी मधे देखिल कॉपर महत्वाची भुमिका पार पाडते.
जमिनीत कॉपर हे वहनशिल असे अन्नद्रव्य नसल्याने कमी प्रमाणात मुळांची वाढ झालेली असल्यास कॉपर ची कमतरता जाणवते.
जास्त सामु असलेल्या जमिनीत कॉपर ची कमतरता जाणवते. सेंद्रिय पदार्थ जास्त असलेल्या जमिनीत कॉपर चे चिलेशन होवुन त्याची पिकास होणारी उपलब्धता वाढते.
जास्त प्रमाणात झिंक असल्यास कॉपर ची कमतरता जाणवते. जास्त प्रमाणात नत्राचे शोषण झाल्यास कमी प्रमाणातील कॉपर चे पिकाच्या टोकाकडिल भागात कमी प्रमाणात वहन होते.
कॉपर च्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात, व्दिदल वर्गिय पिकात गरजे पेक्षा जास्त प्रमाणात फांद्या दिसुन येतात. पिकाची वाढ खुंटते, पुंकेसराच्या फर्टिलिटि वर परिणाम झाल्याने परागीभवनात देखिल परिणाम जाणवतात.
पिकाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे रोगांचे प्रमाण वाढीस लागते.
कॉपर जास्त प्रमाणात झाल्यास पिकाची पाने गर्द निळसर हिरवी होतात, त्यानंतर पानांच्या रंग पांढरा होतो. पिकाव्दारे कमी प्रमाणात फेरस चे शोषण झाल्यास कॉपर विषबाधे पर्यंतची पातळी गाठु शकते. माती परिक्षण केल्या शिवाय जास्त प्रमाणातील कॉपर चा वापर हा अनेक वर्षांपर्यंत घातक ठरतो.
जमिनीत जास्त प्रमाणात कॉपर असल्यास नत्र, स्फुरद, मॉलेब्डेनम, झिंक च्या वापरातुन जास्त कॉपर चे दुष्परिणाम दुर करता येतात.
4) मँगनीज
प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड चा वापर होण्यासाठी मँगनीज ची गरज भासते. मँगनीज हे नायट्रेट च्या वापरात देखिल कार्य करते.
हरितलवक निर्मितीमधे गरजेचे असते. पिकामधे मेद (फॅट) तयार करण्याच्या प्रक्रियेस मँगनीज उत्तेजना देते.
पिकात रायबोफ्लॅवीन, अस्कॉर्बीक अँसिड आणि कॅरोटेन (व्हीटामीन बी, सी, व ए) च्या निर्मितीसाठी गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे विघटन होवुन त्यापासुन हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळा होतो त्या हिल्स रिअँक्शन मधे गरजेचे आहे.
जास्त सामु असलेल्या जमिनीत मँगनीज ची कमतरता निर्माण होते. इथर सुक्ष्म अन्नद्रव्यांप्रमाणे मँगनीज देखिल सेंद्रिय पदार्थांव्दारा चिलेट केले जाते ज्यामुळे पिकांस उपलब्धता वाढते.
ज्या जमिनीत जास्त प्रमाणात फेरस आहे किंवा फेरस खत दिल्यानंतर मँगनीज ची कमतरता जाणवते.
मँगनीज पिकात वहनशील नसल्या कारणाने त्याची कमतरता हि नविन पानांवर प्रथम दिसुन येते. पानांच्या शिरांमधिल भाग पिवळसर होतो. कधी कधी पानांवर तपकिरी काळसर रंगाचे चट्टे पडतात.
एक एकर क्षेत्रात जमिनीतुन देण्यासाठी मँगनीज ची शिफारस हि 450 ग्रॅम ते 2.25 किलो इतकी केली जाते.
मँगनीज जमिनीवर पसरवुन न टाकता ते जमिनीत गाडुन मुळांच्या जवळ द्यावे.
5) मॉलेब्डेनियम
पिकाव्दारे शोषुन घेतलेल्या नायट्रेट चे रुपांतर अँमिनो अँसिड मधे होण्यासाठी मॉलेब्डेनियम ची गरज भासते. ज्या पिकांच्या मुळांवर नत्र स्थिर करणा-या जीवाणूंच्या गाठी तयार होतात त्या पिकात नत्र स्थिरीकरणासाठी गरजेचे आहे. पिकाव्दारे शोषुन घेतलेल्या स्फुरद चे रुपांतर पिकात सेंद्रिय स्फुरद मधे करण्यासाठी गरजेचे आहे.
मॉलेब्डेनिमय हा एक ऋणभार असणारा आयन असल्या कारणाने जमिनीत वाहुन जाण्याचे प्रमाण जास्त असते.
सुक्ष्म अन्नद्रव्यातील मॉलिब्डेनियम हे एकमेव असे मुलद्रव्य आहे जे जास्त सामु असतांना उपलब्ध होते आणि कमी सामु असतांना त्याची उपलब्धता कमी होते.
सल्फेट च्या वापराने मॉलिब्डेनियम ची उपलब्धता कमी होते. स्फुरद च्या उपस्थितीत मॉलिब्डेनियम ची उपलब्धता वाढते.
ज्या जमिनीत अमोनियम स्वरुपातील नत्र युक्त खतांचा वापर केला जातो तेथे युरिया खताच्या वापराच्या तुलनेत मॉलेब्डेनियम कमी जरी असला तरी पिक नियमित वाढ दर्शवते, यावरुन लक्षात येते कि युरिया खतातील नत्राच्या (नायट्रेट) वापरसाठी मॉलिब्डेनियम महत्वाचे आहे.
कोबी पिकातील फुलाचा विचित्र असा आकार ही मॉलिब्डेनियम ची कमतरता आहे. पानांच्या कडी पिवळसर होतात. कलिंगड, भोपळा वर्गिय पिकात याची गरज जास्त असते, पाने पिवळी पडतात जर मॉलिब्डेनियम कमी असेल तर. मॉलेब्डेनियम कमतरतेमुळे फुलातील एंब्रियो (गर्भ) हा व्यवस्थित तयार होत नाही, तर पुकेंसरांची फर्टिलिटी देखिल कमी होते, ज्यामुळे फळधारणेवर विपरित परिणाम होतो.
Share your comments