1. कृषीपीडिया

मशरुमचं उत्पन्न घेत आहात का, मशरुमचा 'हा'प्रकार आहे फायदेशीर

KJ Maharashtra
KJ Maharashtra
मिल्कि मशरूमची फायदेशीर शेती

मिल्कि मशरूमची फायदेशीर शेती

मशरूमचे विविध प्रकार आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशरूमचे उत्पन्न घेतले जाते. वेगवेगळ्या हवामानात चांगल्या उत्पादनासाठी हे मशरुम उत्तम असतात. मशरूमचे विविध प्रकार आहेत, जसे आयस्टर मशरूम, बटन मशरूम इत्यादी मशरूमचे प्रकार आहेत.

मशरूमचे तसे हजारो प्रकार आहेत परंतु खाण्यासाठी योग्य अशी काही मोजकेच आहेत. मशरूम या पिकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण शेतीशिवाय मशरूमचं उत्पादन घेऊ शकतो आणि कमी जागेत शेती करता येते. कमी गुंतवणुकीमध्ये अधिक नफा आपल्याला मिळतो.  चांगले व्यवस्थापन आणि प्रशिक्षण घेतले तर मशरूमचे उत्पादन एक आर्थिक कणा बनू शकतो. मशरूमच्या विविध प्रकारापैकी मिल्की मशरूमविषयी या लेखात आपण माहिती घेऊ.

 मिल्की मशरूम

 मिल्की मशरूमची लागवड ही उन्हाळ्याच्या काळात केली जाते. जर या प्रकारच्या मशीन ची लागवड आपण व्यावसायिकदृष्ट्या केली तर चांगले उत्पन्न मिळवू शकतो. या मशरूम साठी 28 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान तसेच 80 ते 90 टक्के आद्रता असावी लागते. अधिक तापमानात देखील मशरूमचे उत्पादन चांगले येते.

 मशरूमच्या उत्पादनासाठी आवश्यक साहित्य

 मिल्की मशरूमसाठी एक अंधार असलेली खोली, बियाणे, भुसा, हायड्रोमीटर,  फवारणी, यंत्र, वजन करणारी मशीन, पेंढा कटिंग करणारी मशीन,  प्लास्टिक ड्रम आणि शीट, पी पी बॅग आणि रबर बँड इत्यादी साहित्य आवश्यक असते. मिल्की मशरूम वाढवण्यासाठी गहूचा किंवा भाताचा पेंढा सर्वात जास्त उपयुक्त असतो.  पेंढा कापल्यानंतर आपण त्याला कपड्यांच्याछोट्या पिशव्यांमध्ये भरला आणि कमीत कमी 12 ते 16 तास गरम पाण्यात बुडवून ठेवावे लागते. जेणेकरून पेंडा पाणी चांगले शोषून घेईल.

लागवडीपूर्वीची तयारी

जेथे आपण लागवड करणार आहोत त्या ठिकाणी भुसा घालण्यापूर्वी संबंधित जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी किंवा फर्मोलीनची फवारणी करावी. रासायनिक उपचारांसाठी सिमेंटच्या टाक्यांमध्ये 90 लिटर पाण्यात 10 किलो भुसा भिजत घालावा. त्यानंतर एका बादलीमध्ये 10 लिटर पाणी घेऊन त्यात दहा ग्रॅम वेबिस्टीन आणि पाच मिली फार्मोलीन मिसळावे. हे द्रावण ड्रममध्ये भिजलेल्या भुसा मध्ये घालावे संबंधित ड्रमला पॉलिथिन ने झाकून ठेवावे आणि त्यावर काही वजनाची सामग्री ठेवावी. जवळ जवळ दाभोसा 12 ते 16 तास भिजवल्यानंतर ड्रम मधून पेंढा काढून त्याच जमिनीवर पसरवून ठेवावे जेणेकरून जास्त असलेले पाणी बाहेर येतं. या सगळ्या प्रक्रियेनंतर झेंडा हा मिल्की मशरूमच्या लागवडीसाठी तयार होतो.

 

एक किलो भुश्यासाठी  40 ते 50 ग्रॅम बियाणे आवश्यक असते. यामध्ये सोळा सेंटीमीटर रुंद आणि 20 सेंटिमीटर उंच पिपि बॅगमध्ये तयार केलेला पेंढा टाकावा.  बियाणे जोडल्यानंतर त्यावर उपचारित पेंढा घाला. पीपी बॅगमध्ये दोन ते तीन पृष्ठभाग पेरणी करता येते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण पी पी बॅग  बांधावी.  आणि त्यास एक गडद खोलीत ठेवावे. याला दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तापमान 28 ते 38 डिग्री ठेवावे आणि आद्रता हे 80 ते 90 टक्के ठेवावी.  काही दिवसानंतर बॅगा या बुरशीमुळे भरलेले दिसतात. यानंतर तुम्ही त्यावर केसिंग करा. केसिंग साठी जुने शेन उपयुक्त मानले जाते. ओलावा टिकण्यासाठी पाण्याची फवारणी देखील करावी लागते.

पिकाची काढणी

जेव्हा मशरूम 5 ते 7 सेंटीमीटर झाल्यावर त्याला तोडावे लागते.  तयार मशरूम पीपी बॅगमध्ये ठेवावे.एक किलो भुशापासून आपल्याला एक किलो ताजा मिल्की मशरूम मिळतो.  यासाठी प्रति किलो 20 ते 25 रुपये खर्च येत असतोपरंतु विक्री ही त्याची 200 ते 400 रुपये प्रति किलो दराने होते. अशा प्रकारे शेतकरी मशरूमच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters