आपले उत्पन्न वाढविण्यासाठी मधुमक्षिका पालन हा एक उत्तम पर्याय आहे. सरकारकडून यासाठी प्रशिक्षण आणि कर्जही दिले जाते. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासाठी मधुमक्षिका पालन हा उत्तम व्यवसाय आहे. पण या व्यवसायात एक समस्या निर्माण झाली आहे. या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मधमाशी.
सध्याची शेती पद्धत या मधमाशीसाठी घातक ठरत आहे. अधिक उत्पन्न आणि कीटकांच्या बचावासाठी शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करत असतो. पण हेच कीटकनाशक मधमाशांच्या जीवाशी उठले आहेत.
याविषयीचा एक लेख डाऊन अर्थ या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे.
कीटकनाशकामुळे मधमाशांच्या डोक्यावर परिणाम होत असतो. एका संशोधनात ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मधमाशी अन्नाच्या शोधात जेव्हा त्या कीटकनाशकांच्या संपर्कात येतात. तेव्हा कीटकनाशक त्यांच्या डोक्यावर परिणाम करत असते. याविषयीचा अभ्यास लंडनमधील इंपिरियल महाविद्यावलयाने केला आहे. मायक्रो- सीटी स्कॅनिंगच्या तंत्राद्वारे याचा अभ्यास करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रौढ माशांवर अभ्यास करण्यात आला आहे. या माशा कीटकनाशक फवारलेल्या फळांवरील रस आणि सुगंध गोळा करत असतात. परंतु नवीन करण्यात आलेल्या अभ्यासात नवीन गोष्ट उघड झाली आहे. मधमाशी जेव्हा हे दुषित रस आणतात तेव्हा त्याच्या सेवनाने लहान मधमाशांना म्हणजे मधमाशांच्या पिल्लांवर याचा विपरित परिणाम होत असतो.
लहान मधमाशांचा व्यवस्थित विकास होत नसून त्या प्रौढ झाल्यानंतर व्यवस्थित काम करत नाहीत.
इंपिरियलमधील जीव विज्ञान विभागातील प्रमुख संशोधन कर्ते डॉ. रिचर्ड गिलच्या मते मधमाशांचे मोहोळ हे सुपरऑर्गेनिज्नच्या रुपात कार्य करतात. यामुळे जेव्हा कधी विषाचा मोहोळमध्ये प्रवेश होतो, तेव्हा त्याचा परिणाम हा शिशु लहान मधमाशींवर होत असतो. या अभ्यासाविषयीची माहिती प्रोसिडिंग्स ऑफ रॉयल सोसायटी बी नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झाली आहे.
जेव्हा नवीन पीढीतील मधमाशी कीटकनाशक -मिश्रित अन्नाचे सेवन करते. तेव्हा त्यांच्या डोक्यावर त्याचा परिणाम होत असून त्यांचा विकास कमी होत असतो.
यामुळे मधमाशा योग्यप्रकारे काम करत नाहीत. याचा प्रभाव कायम राहत असतो. यावरुन आपल्या लक्षात येते की, कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यानंतर मधमाशांचे मोहोळ कशाप्रकारे प्रभावित होत असते. प्रौढ झाल्यानंतर या माशा व्यवस्थित अन्न ग्रहण करु शकत नाहीत.
कीटकनाशकांचा किती प्रमाणात उपयोग केला गेला पाहिजे याच्या मार्गदर्शनाची गरज जाणवते. पर्यावरणातील एका घटकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकाच्या उपयोगाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
Share your comments