1. कृषीपीडिया

Important!लागवड केलेल्या कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडत आहेत? ही आहेत त्यामागची कारणे आणि उपाय

कांदा हे पीक महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रमाणात लावले जाते.नाशिक कांद्याचे आगार आहे.आता महाराष्ट्रातल्या इतर भागातील शेतकरी सुद्धा कांदा पिकाकडे वळत आहेत. कांदा हे नगदी पीक आहे. परंतु कांदा हे पीक वातावरणाला अतिसंवेदनशील आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध प्रकारच्या रोगांचा कांदा पिकावर प्रादुर्भाव होतो.त्यामध्ये करपा, पांढरीसडइत्यादी परंतु कांदा पिकाच्या पातीचे शेंडे पिवळे पडणे एक फार मोठी समस्या आहे.कांद्याची शेंडे पिवळे का पडतात? यामागची कारणे काय? याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion crop

 कांद्याचे शेंडे पिवळे पडण्याची कारणे

  • सर्वात महत्वाचे कारण आहे की कांदा पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला र शेंडेपिवळे पडतात.
  • पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता भासलीतरीशेंडे पिवळे पडतात.
  • जास्त पाऊस
  • पिकांना जास्त प्रमाणात पाणी दिले तर शेंडे पिवळे पडतात.
  • हिवाळ्यामध्ये प्रमुख्याने धुक्याचा  प्रादुर्भाव झाल्यास शेंडे पिवळे पडायला लागतात.
  • कांद्याच्या मुळाची नीट वाढ न होणे
  • कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला तरीदेखील कांद्याच्या पातीवर पिवळी तपकिरी चट्टे पडतात.

कांद्याचे शेंडे पिवळे पडणे या समस्येवर उपाय

  • पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिक कॅप्टन दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • कांद्याच्या रोपवाटिकेतील रोपांची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसातून मॅन्कोझेब 25 ग्रॅम + डायमेथोएट 15 मिली +स्टीकर 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात दोन वेळा फवारणी करावी.
  • कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी मॅन्कोझेब 25 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
  • कांदा वरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसायला लागताच 10 ते 15 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा ट्यूबकोण्याझोल10 मिली या बुरशीनाशकाची फवारणी दहा लिटर पाण्यात मिसळून करावी.
  • या काळामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकीडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (35 टक्के इसी ) 15 मिली किंवा लॅबडासायक्लोथ्रीन(5 टक्के इसी ) सहा मिली अधिक स्टिकर 10 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारणी करावी.
  • कांद्याला जास्त प्रमाणात पाणी देण्याऐवजी हलके पाणी द्यावे.
  • कांद्याचे शेंडे पिवळे पडले असतील किंवा वाढ नीट होत नसेल तर जैविक उपाय म्हणून 15 लिटर पंपासाठी दोनशेमिली गोमूत्र अधिक 200 मिली दुधाची फवारणी पिकांवर करावी.
English Summary: yellow spot on onion crop remedy and management Published on: 05 October 2021, 06:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters