दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही पदार्थ आणि दूध एकत्र सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्टही होतात. आयुर्वेदामध्ये याला विरुद्ध आहार म्हणतात.
आयुर्वेदानुसार, काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात
दुधासोबत चिप्स आणि चटपटीत पदार्थ खाणे टाळा. मिठामुळे दुधात असलेल्या प्रोटीनचा पूर्ण फायदा मिळू शकत नाही.
तसेच असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही होऊ शकतात.
तुम्ही जे खाताय त्यात कांदा असेल तर त्यासोबत किंवा ते खाऊन झाल्यावर दुधाचं सेवन करू नका. या कॉम्बिनेशनने खाज, एग्जिमा, शरीरावर लाल चट्टे अशा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
तिखट-मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाणे टाळा.
हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या होऊ शकते.
दूध आणि दह्यापासून तयार पदार्थ एकाचवेळी खाऊ नये. हे पदार्थ एकाचवेळी खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस, उलटी आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.
आयुर्वेदानुसार, काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
तुम्ही जे खाताय त्यात कांदा असेल तर त्यासोबत किंवा ते खाऊन झाल्यावर दुधाचं सेवन करू नका. या कॉम्बिनेशनने खाज, एग्जिमा, शरीरावर लाल चट्टे अशा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
तिखट-मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या होऊ शकते.
Share your comments