
आजकाल बारावी नंतरच्या करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत – इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, आर्ट्स... पण एक पर्याय असा आहे जो कृषी, उद्योग, संशोधन आणि स्टार्टअप यांना एकत्र जोडतो – तो म्हणजे B.Sc. Agriculture!
B.Sc. Agriculture म्हणजे नेमकं काय?
B.Sc. Agriculture ही एक चार वर्षांची पदवी आहे, जी विद्यार्थ्यांना कृषी विषयातील शास्त्रीय ज्ञान, प्रायोगिक शिक्षण, आणि उद्योगक्षमतेचा अनुभव देते. यात पिके, माती, कीडनाशकं, पशुपालन, कृषी अर्थशास्त्र, अन्नप्रक्रिया, बायोटेक्नॉलॉजी, कृषी अभियांत्रिकी असे अनेक विषय शिकवले जातात.
B.Sc. Agriculture का करावी? कारणं जाणून घ्या:
कृषी क्षेत्रात भरपूर संधी
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शासकीय व खासगी क्षेत्रात सतत मागणी असते.
कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी (TAO), MPSC-PSI/SSC च्या कृषी विषयांमध्ये फायदा.
स्टार्टअप आणि शेती व्यवसायासाठी उत्तम बेस
आपली स्वत:ची आधुनिक शेती, अन्नप्रक्रिया युनिट, किंवा ऑरगॅनिक उत्पादनांचा ब्रँड उभारता येतो.
स्टार्टअपसाठी सरकारतर्फे अनुदान आणि स्कीम्स (PM-Kisan, Agri-Infra Fund) उपलब्ध.

शेती नवउद्योगात करिअर
अॅग्रीटेक, ड्रोन शेती, कृषी अॅप्स, सेंद्रिय शेती, निर्यात व्यवसाय – ही क्षेत्रं वेगाने वाढत आहेत.
कृषी सल्लागार, माती परीक्षण, फर्टिलायझर कंपन्यांत नोकरीची संधी.
सरकारी नोकऱ्यांत खास वेटेज
कृषी विषय असलेल्या परीक्षांमध्ये B.Sc. Agri पदवीधारकांना विशेष प्राधान्य.
NABARD, FCI, कृषि विभाग, पशुसंवर्धन, बँकांमध्ये कृषी अधिकारी पदासाठी संधी.
उच्च शिक्षण आणि रिसर्चचा मार्ग खुला
M.Sc. Agriculture, MBA Agri Business, किंवा ICAR वरील संशोधनाच्या संधी.
विदेशात कृषी तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठीही मोठा दरवाजा खुला!
कोण करू शकतं B.Sc. Agri?
बारावी (सायन्स) – बायोलॉजी/मॅथ्स गटातून उत्तीर्ण विद्यार्थी हे अभ्यासक्रम करू शकतात.
प्रवेश अनेक ठिकाणी CET किंवा ICAR AIEEA अशा परीक्षांद्वारे घेतला जातो.
खरं तर...
"देशाचं भविष्य शेतकऱ्यांच्या हाती आहे… पण शास्त्रीय शेती शिकलेल्या तरुणांच्या बुद्धीने देशाला समृद्धी मिळू शकते!"
तुमच्या शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरीसाठी नाही, तर शेतीला दिशा देण्यासाठीही होऊ शकतो.
निष्कर्ष:
B.Sc. Agriculture ही सिर्फ एक डिग्री नाही – ती एक अशी शिडी आहे जी तुम्हाला शाश्वत करिअर, स्टार्टअप्स, आणि समाजसेवा या तिन्ही दिशा खुल्या करून देते. तुमचं बळ वापरा, आणि कृषी क्षेत्रात नवीन भविष्य घडवा!
लेखक:
नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व करिअर मार्गदर्शक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments