महाराष्ट्राची ऊस पंढरी ही ओळख असलेल्या सांगली येथील 'आष्टा' येथे होय आम्ही शेतकरी समूह आणि गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन केले जाते.गेली ५ वर्ष आपण सातत्याने या चर्चासत्राच्या माध्यमातून ऊस विकासासाठी कायम प्रयत्नशील आहोत. शेतकरी मित्रांना ऊस पिकाची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी तसेच ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट पाहून आपल्या शेतीत बदल करता यावेत हा या
चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पूर्वहंगामी, सुरू व खोडवा पिकाच्या व्यवस्थापनासाठी नेमकं काय करायला हवं याबाबत ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन केले आहे.24 नोव्हेंबर २०२२ रोजी
जाणून घ्या अत्यंत महत्त्वाची गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल
हेवन हॉल, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथे सकाळी ९ पासून संध्याकाळी ७ पर्यंत चर्चासत्राचे आयोजन केले आहे.महाराष्ट्र आणि मराठी भाषिक इतर राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या चर्चासत्रास सहभागी व्हावे.All sugarcane farmers of Maharashtra and other Marathi speaking states should participate in this seminar.विशेषता मागील एक दोन वर्षात शेतीत पडलेल्या
तरुणांनी आवर्जून या चर्चासत्रास भेट द्यावी कारण या सर्व आधुनिक बाबी आपणास पहावयास व ऐकावयास मिळतील. ऊस पीक चर्चासत्रात आपणास काय मिळेल.१. तज्ज्ञांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. २. सुरू,पूर्वहंगामी तसेच खोडवा उसाचे एकरी 80-100 मेट्रिक टन उत्पादन तंत्रज्ञान.३. कीडरोग व्यवस्थापन.४. उसाच्या विविध जाती याबाबत सखोल मार्गदर्शन५. अनुभवी शेतकरी आणि संशोधकांचे ऑन फिल्ड मार्गदर्शन. ६. ऊस शेतीत आलेली नवीन तणनाशके व कीटकनाशके. ७. ऊस शेतीमधील आधुनिक पद्धती वापरून तयार केलेले डेमो प्लॉट ८. आदर्श खोडवा, सुरु लागण, बियाणे प्लॉट
देखील पाहायला मिळतील.८.ऊस शेतीमध्ये काळ्या खोल जमिनीत केलेली निचरा पाईप प्रणाली पाहावयास मिळेल. ९. गन्ना मास्टर कंपनीच्या उत्पादनावर भरघोस सूट.१०. महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकरी व त्यांचे ऊस शेतीतील अनुभव आणि संवाद साधण्याची संधी.चला तर मग आजच नाव नोंदणी करा आणि ऊस शेतीतील जाणकार बना.
-डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
(प्रबंधक - होय आम्ही शेतकरी समूह)
प्रवेश फी मध्ये - २ वेळा नाश्ता, एक वेळ जेवण आणि सोबत मार्गदर्शन एवढे मिळून फक्त आणि फक्त 200 रुपये शुल्क आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण - Hevan Hall Ashta - Tasgaon Rd, Ashta, Maharashtra 416301
https://maps.app.goo.gl/VwxKr
बुकिंग साठी संपर्क
शरद आवटी - 9503039173
Share your comments