1. कृषीपीडिया

जीवाणू ची जमिनीला गरज का आहे ?

आपण आज जैविक खतांचे प्रकार, वापर, फायदे बघणार आहोत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जीवाणू ची जमिनीला गरज का आहे ?

जीवाणू ची जमिनीला गरज का आहे ?

आपण आज जैविक खतांचे प्रकार, वापर, फायदे बघणार आहोत.१) नत्र स्थिर करणारी जैविक खतेअ) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खतेरायझोबियमः रायझोबियम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतो. या गाठींमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. सर्वसाधारणपणे रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी ५0 ते १५0 किलो नत्र स्थिर करतात. रायझोबियम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १९ ते ६२ टक्के वाढ आढळून आली आहे. रायझोबियम जिवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जिवाणू दुस-या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जिवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग इ. द्विदल पिकांसाठी वापरले जाते. त्याचा तपशील पुढील तक्त्यात दिला आहे.ब) असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते : अझेटोबॅक्टर,अझोस्पीरीलम, असिटोबॅक्टर.अझेटोबॅक्टर : अझेटोबॅक्टर जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरुपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझेटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते. अझेटोबॅक्टर जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या विकरणातून तयार होणा-या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जिवाणूच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे लागते. सर्वसाधारणपणे अझेटोबॅक्टर जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो १४ ते ३३ टक्के वाढ आढळून आली आहे.

अझोस्पीरीलम : अझोस्पीरीलम जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात.एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझोस्पीरीलम जिवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे अझोस्पीरीलम जिवाणू प्रति हेक्टरी २0 ते ४0 किलो नत्र स्थिर करतात. अझोस्पीरीलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ आढळून आली आहे.असिटोबॅक्टर : हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत.असिटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये व पिकामध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये असिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३0 ते ३00 किलो नत्र स्थिर करतात. असिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २० टक्के वाढ आढळून आली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा, इ. मध्ये वापरासाठी असिटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.२) स्फुरद विरघळविणारी जैविक खते स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के स्फुरदपिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम बॅसिलस मेगाटेरीएम सारखे स्फुरद विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात. स्फुरद विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

३) पालाश उपलब्ध करणारी जैविक खतेपालाश हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे. परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्धउरण्याचे काम बॅसिलस म्युसिलाजिनस सारखे पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १o ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.४) झिंक विरघळविणारी जैविक खतेझिंक हे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळविण्याचे काम बॅसिलस स्ट्रिआटा सारखे झिंक विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते. झिंक विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.५) मायकोरायझा - मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

६) जिवाणू संघ अ) घनरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू) ब) द्रवरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू संघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळवणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा समावेश असतो. या जिवाणूंचे निर्जतुक वाहकामध्ये मिश्रण करून जिवाणू संघ तयार केला जातो. जिवाणू संघ हा पीकनिहाय तयार करता येतो व त्यामुळे शेतक-यांना वापरण्यासाठी जैविक संघ अतिशय उपयुक्त आहे.स्यूडोमोनास फ्लोरेसेन्स म्हणून ओळखल्या जाणार्या जीवनाचे वर्णन करणार आहे. विशिष्ट उदाहरणांसह आपण हे जाणून घ्याल आणि शेतीसाठी ते कसे महत्त्वपूर्ण आहे.नावात काय आहे?जॉन गोल्डस्मिथ नावाचा कोणीतरी कदाचित एका वेळी एक कुटुंबाचा सदस्य होता जो सोनेरी होता. बॉब जॉन्सन नावाच्या कुणीतरी कदाचित कुटुंबाचा सदस्य होता जो जॉनचा मुलगा होता. नावे आम्हाला किंवा आमच्या इतिहासाबद्दल काहीतरी सांगू शकतात.स्यूडोमोनास फ्लुरेसेन्सच्या बाबतीत असे बरेच जीवाणूजन्य नावे आहेत. हे काय आहे आणि शेतीवर ते कसे लागू होते ते शोधूया.स्यूडोमोनास फ्लुरेसेन्स म्हणजे काय?स्यूडोमोनास फ्लुरेसेन्स हा एक प्रकारचा जीवाणू आहे. विशेषतया, या बॅक्टेरियाचे बहुतेक भाग कर्तव्ययुक्त एरोब आहेत.

दुसर्या शब्दात, ते टिकून राहण्यासाठी ऑक्सिजनवर अवलंबून असते.हे एक ग्राम-नकारात्मक जीवाणू देखील आहे. याचा अर्थ ग्राम-पॉझिटिव्ह बॅक्टेरियापेक्षा तुलनेने पातळ सेलची भिंत आहे. याव्यतिरिक्त, हे एक बेसिलस आहे. बॅसिलस हा एक जीवाणू आहे ज्याचा आकार रॉड सारखा आहे.तर मग नाव काय आहे? गोल्डस्मिथ आणि जॉन्सन यांनी शेवटच्या नावाप्रमाणेच पी. फ्लुरेसेन्सचे शेवटचे नाव (प्रजातीचे नाव) प्रकट केले आहे की ते फ्लोरोसेंट रंगद्रव्य तयार करण्यास सक्षम आहे. पायोव्हरडिन नावाचा हा विशिष्ट भाग म्हणजे हिरवे चमकणे!शेती वापर परंतु या पाठासाठी या बॅक्टेरियमबद्दल आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी ही म्हणजे ही एक जीवाणू आहे जी माती, वनस्पती आणि पाण्यामध्ये राहते. खरं तर, पी. फ्लोरेसेन्स मातीत राहण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. विशेषतः, त्यांना विविध कृषी पिकांच्या मुळांच्या आसपास जगणे आवडते.झाडांच्या जवळ राहून त्यांना पोषक व पर्यावरणीय संरक्षण मिळते. मूलभूतपणे, त्यांना घर आणि अन्न मिळते जसे बेड आणि ब्रेकफास्ट. त्या बदल्यात,ते अशा गोष्टी नष्ट करतात ज्या वनस्पतींना संभाव्यत:हानिकारक असू शकतात. या गोष्टींमध्ये विषाणू आणि प्रदूषक, जसे टीएनटी, स्टायरिन आणि पॉलिसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स समाविष्ट आहेत.

English Summary: Why do bacteria need soil? Published on: 22 June 2022, 05:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters