संत्रा/मोसंबीतील एकसारखी (uniform) फुट येत नसने आणि बहार न येणे यामागील कारणाचा उहापोह करताना हा लेख सर्वच बागायतदारांस महत्वपूर्ण असेल.आता आपण वरील विषयावर अभ्यास करूयात कि...फळझाडे बहार (फुले) का व कसे देतात त्या मागील खालील कारणे समजले कि फळशेती अतीशय सुलभ व सोपी आहे.
मुख्यत्वेकरून कोणताही विश्वातील सजीव खाली दोन कारणावरूनच उत्पत्तीचे दान निसर्गास देतो किंवा निसर्गच जीवाकडून त्या कारणामुळे उत्पत्ती करवून घेत असतो....१. झाड किंवा जीवाचा मरणप्राय तान-तनावाचा काळ असेल तेंव्हा When the tree or life is in the period of death stress,२.झाड किंवा जिवाचा समृद्ध काळ म्हणजेच झाडातील अन्नाचा समतोल साठा व निसर्ग नियमित जीवाचरण असेल तेव्हाच
या वरील दोन कारणाशिवाय फलोत्पत्ती होवुच शकत नाही.असे असताना निसर्ग नियमित जिवन चक्राचा विचार न करता कृत्रिम रितीनेच फवारे मारून बहाराचा अट्टाहास धरनारे व बहार फुलांची जादू दाखवणारे 'कृषीतज्ञ' किती बागायतदार मंडळीना मुर्ख बनवीतात हे यावरूनच स्पष्ट होते.बहार येण्यासाठी औषधं फवारून फुलांनी भरमार केलेल्या जादुगीरी द्वारेच आपण झाडाला आतून
खिळखिळे व दुर्बल बनवत असतो. त्यामुळेच बहारानंतरच्या काळात फळगळ, फांद्या वाळणे, रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असतो. ताण काळातील क्लोरोमेटेड क्लोराइड (लीवोसीन), प्याक्लोबुट्राझोल (जीका) किंवा बहार काळातील नायट्रोबेन्झीन व विवीध स्टिम्युलंट चा सर्रास वापर करणे मुर्खपणाचे लक्षण होय.
संकलन - पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क - ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
Share your comments