1. कृषीपीडिया

खरीप हंगामातील ज्वारीची पेरणी कधी करावी आणि कोणते वाण निवडले पाहिजे? पहा

नैॡत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
खरीप हंगामातील ज्वारीची पेरणी कधी करावी आणि  कोणते वाण निवडले पाहिजे? पहा

खरीप हंगामातील ज्वारीची पेरणी कधी करावी आणि कोणते वाण निवडले पाहिजे? पहा

नैॡत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी. जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटाची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायामेथोक्‍झाम (७० टक्‍के) या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.ज्वारीचे खरीप वाण: पी.व्ही.के. ८०१ (परभणी श्‍वेता):- या वाणाचे दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. या वाणापासून हेक्‍टरी ३२-३५ क्विंटल धान्याचे व १०-१२ टन चाऱ्याचे उत्पन्न मिळते. ११५-१२० दिवसांत तयार होणारे हे वाण दाण्यावर येणाऱ्या काळ्या बुरशी रोगास सहनक्षम आहे.

*पी. व्ही. के. ८०९:- उंच वाढणाऱ्या या वाणापासून ३५-३६ क्विंटल दाणे, तर १२०-१२२ क्विंटल वाळलेला कडबा मिळतो. दाण्याचा रंग मोत्यासारखा चमकदार असून, हे वाण काळ्या बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणास पक्वतेसाठी ११८ दिवस लागतात.संकरित वाण:- सी.एस.एच-१४:- या वाणापासून ४०-४५ क्विंटल धान्याचे, तर ८.५-९ टन कडब्याचे उत्पन्न मिळते. हा वाण १००-१०५ दिवसात तयार होतो. पावसात दाणे विशेष काळे पडत नाहीत.सी.एस.एच.-१६ ःमध्यम ते भारी जमिनीसाठी अखिल भारतीय स्तरावर हा वाण प्रसारित झाला असून, तो १०५-१०७ दिवसात पक्व होतो. या वाणाची उंची १९०-२०० सें.मी. असून धान्य उत्पादन ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्‍टर तर कडबा उत्पादन ९ ते ९.५ टन प्रतिहेक्‍टर मिळते.

सीएसएच- २५ (परभणी साईनाथ/ एस.पी.एच. १५६७):- उंच वाढणारा हा वाण ११० दिवसांत पक्व होत असून, त्यापासून प्रतिहेक्‍टरी ४३.३ क्वि. धान्य उत्पादन आणि १२०.७ क्वि. कडब्याचे उत्पादन मिळते, तसेच हे वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी उत्तम आहे.एसपीएच १६३५:- खरीप हंगामात मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठीचा हा वाण १०८ ते ११० दिवसात पक्व होतो. या पासून हेक्‍टरी ३८ ते ४० क्विंटल धान्याचे आणि ११८ ते १२० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. हा वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असून, धान्याची व भाकरीची प्रत उत्तम आहे.

जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटाची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायामेथोक्‍झाम (७० टक्‍के) या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.ज्वारीचे खरीप वाण: पी.व्ही.के. ८०१ (परभणी श्‍वेता):- या वाणाचे दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. या वाणापासून हेक्‍टरी ३२-३५ क्विंटल धान्याचे व १०-१२ टन चाऱ्याचे उत्पन्न मिळते. ११५-१२० दिवसांत तयार होणारे हे वाण दाण्यावर येणाऱ्या काळ्या बुरशी रोगास सहनक्षम आहे.

English Summary: When should kharif sorghum be sown and which varieties should be selected? See Published on: 29 June 2022, 07:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters