कीड नियंत्रण
मावा या किडीची पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने आढळतात. पानांतील पेशीरस शोषून घेतात. परिणामी, गहू पिकाची पाने पिवळसर रोगट होतात. त्याचप्रमाणे या किडीच्या शरीरातून स्रवलेल्या मधासारख्या गोड चिकट द्रवांवर काळी बुरशी वाढते. पानांची प्रकाशसंश्लेषण क्रिया त्यामुळे बंद होऊन, उत्पादनामध्ये घट होते. तीव्र प्रादुर्भावामध्ये गव्हाची रोपे किंवा झाडे मरतात.
व्यवस्थापन
शेतामध्ये एकरी १०-१२ पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात येते आणि योग्य त्या उपाययोजना करता येतात.
मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिले/ प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर त्वरित उपाययोजना कराव्यात.
जैविक उपायांमध्ये लेकॅनिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमिथोक्झाम ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
जनावरांच्या कृत्रिम गर्भाधानाचे फायदे आणि तोटे
तुडतुडे तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांचे शेंडे गळून पाने पिवळी पडू लागतात. रोपांची वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
आदिवासी महिला गायीच्या शेणापासून स्वयंपूर्ण, तयार केला रंग, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक..
व्यवस्थापन
डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.
महत्वाच्या बातम्या;
करून दाखवलच! रविकांत तुपकरांचा आत्मदहन आंदोलनाचा धसका, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
शेतकऱ्यांनो उन्हाळी भेंडी लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या...
Share your comments