महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर गहु पिकाची पेरणी करतात. तसे उत्पंन ही घेतात मात्र त्याआधी गव्हवरील वेगवेगळ्या किड व व रोगांना सामोरे जावे लागते. त्यामूळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यासाठीच आजचा हा लेख यामध्ये आपण वेगवेगळे रोग व त्याचे व्यावस्थापन शिकून घेणार आहोत.
१ )तांबेरा
गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार :
विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे विविध प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोन प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो.
अ. खोडावरील काळा तांबेरा:
हा रोग (पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटीसी) या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाची लक्षणे पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतात. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे इत्यादी सर्वच भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात. पुळ्यांच्या संख्येत वाढ होते, तेव्हा त्या एकमेकांत मिसळतात. खोडावरील व पानाचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले हे फोड म्हणजेच या बुरशीचे बीजाणू असतात. हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते.
जसजसे तापमान वाढत जाते, तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. तांबेरा वाढीसाठी योग्य तापमान १५ अंश ते ३५ अंश से. आवश्यबक असते, तसेच आर्द्रताही पुरेशी लागते. पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे जाताना हवेतील तापमान जसे वाढत जाते, तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. या पुळ्या प्रामुख्याने खोडावर आढळतात, म्हणून याला खोडावरील काळा तांबेरा असे म्हणतात. रोगग्रस्त झालेल्या रोपांपासून कमी प्रमाणात फुटवे निर्माण होऊन उत्पन्न कमी मिळते.
ब. पानांवरील नारिंगी तांबेरा :
हा रोग पक्सिनिया रेकॉनडिटा या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने व देठांवर आढळतो. गव्हाची पाने व खोडावरील देठांवर नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरविल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या तांबेरावाढीस १५ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्याक असते.
क. पिवळा तांबेरा :
हा रोग पक्सिनिया स्ट्रीफोरमीस या रोगकारक बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक पूरळ पानांच्या शिरांवर सरळ रेषांत दिसून येतात. गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो.तसेच वाढीस अनुकूल तापमान १५ अंश ते २० अंश सेल्सिअस असते. या रोगाची तीव्रता जास्त आर्द्रता व पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी वाढते. पिवळा तांबेरा हा महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही.
ड. काळा व नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार :
गहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते, त्या वेळेस या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते. तेथील शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी किंवा गैर हंगामी गहू पिकावर किंवा आपोआप उगविलेल्या गव्हावर ही बुरशी वर्षभर जिवंत असते. नोव्हेंबर महिन्यानंतर दक्षिण समुद्रात होणाऱ्या वादळी वाऱ्यांमार्फत या बुरशीचे जीवाणू निलगिरी व पलणी टेकड्यांवरून प्रवास करतात. वादळी पाऊस जेथे होईल, त्या पावसाबरोबर हे बीजाणू हवेमार्फत १८०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. जर याच वेळेस मैदानी प्रदेशात गहू पिकाची लागवड असेल, तर अनुकूल हवामानात ते गहू पिकावर रुजतात. वाऱ्यांमार्फत या रोगाचा फैलाव पुन्हा निरोगी गहू पिकाच्या क्षेत्राकडे होत राहतो.
तांबेरा नियंत्रणासाठी उपाय
रोगाचा प्रादुर्भाव होताच २०० मि.लि. प्रोपिकोनॅझोल प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. किंवा दोन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दोन ग्रॅम कॉपर ऑक्झिंक्लराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१. तांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या किंवा तांबेरा प्रतिकारक्षम जातींची शिफारशीनुसार निवड करावी.
२. रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.
३.भारी जमिनीत पिकास पाणी देताना पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावे.
४. साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व हलक्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या द्याव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.
५. पूर्वी जिरायती क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या, उंच वाढणाऱ्या बन्सी वा बक्षी गव्हाच्या जातींवर खोडावरील काळा तांबेरा मोठ्या प्रमाणात येत असे; मात्र सध्या गहू पीक हे बहुतांशी बागायत क्षेत्रात घेतले जाते. तसेच, बुटक्याा सरबती जातीही विकसित करण्यात आल्या असल्याने खोडावरील काळा तांबेरा आता क्वचितच आढळतो.
२.काजळी किंवा काणीः
हा रोग युस्टीलँगो ट्रिटीसी या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. ही बुरशी गहू पिकाच्या फुलांवर वाढते. दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. ही काळी भुकटी म्हणजेच काणी. या रोगाची थंड आणि आर्द्र हवामानात अधिक वाढ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.
३.पानावरील करपाः
हा रोग अल्टरनेरिया ट्रिटीसिना या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरिया करपा हा रोग येतो. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पान करपते. १९ ते २० सेल्सियस तापमान, सतत दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार होतो.गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी
Share your comments