1. कृषीपीडिया

बैलपोळ्याचा आणि बोंडअळी चा काय सबंध? आणि त्यावर उपाय वाचा

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात गेल्या

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बैलपोळ्याचा आणि  बोंडअळी चा काय सबंध? आणि त्यावर उपाय वाचा

बैलपोळ्याचा आणि बोंडअळी चा काय सबंध? आणि त्यावर उपाय वाचा

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात गेल्या 5/6 दिवसापूर्वी पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस सुरू आहे, हा पाऊस सर्वच पिकांना उपयुक्त ठरणार आहे. ह्या वर्षी मृग नक्षत्रातच पेरण्या झाल्या, पण त्या वाया गेल्या. वेळेवर कापसाची लागवड न झाल्यामुळे वाढ कमी झाली,थोडा उशिरा पण वेळेवर पाऊस पडल्यामुळे काही भागात कापसाचे पीक अतिउत्तम स्थितीत आहे.ह्या वर्षी प्री मान्सून कापसावर रसशोषक किडही कमी आहे, 55 ते 60 दिवसाचा कापूस झाल्यावरही कीडनाशक

फवारणीची आवश्यकता भासली नाही, त्यामुळे कीटकनाशकांच्या पहिल्या 2 फवारण्या टळल्या.This avoided the first 2 sprays of pesticides. जुलै/ ऑगस्ट महिन्याच्या अमावसेला जो सेन्द्रि अळीचा अटॅक होता तो खूपच सौम्य होता, क्वचित काही शेतात अळी पाहायला मिळाली, शेतकऱ्यांनी अळी नाशकांचा फवारणी करून अळी वर नियंत्रण मिळवले.मित्रानो पोळ्याच्या अमावश्येनंतर येणारा अळीचा अटॅक , सौम्य नसेल 26 ऑगस्ट नंतर आपल्या कापसावर मोठ्या प्रमाणात डोमकल्या व सेंद्रि अळी दिसू लागतिल.

आणि आताही आपल्या बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे, असा बाऊ आता केला जाईल. (कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी) तुमच्या शेतात चांगले निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की ,जी नॉन बीटी ची कापसाची झाडे तुमच्या शेतात आहेत त्यावरच अळी असेल, बीटीच्या झाडावरहि असेल पण बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स असल्यामुळे पान, फुल झाडाचे काहीही अळीने

खाल्ले तरी ती मरेल , कारण 85/90 दिवसापर्यंत बीटीचे जीन्स प्रतिकार क्षम असतात. पण जी नॉन बीटीचे झाड शेतात आहेत त्यावरची अळी मरणार नाही, आणि अशा नॉन बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स नसल्यामुळे त्या कापसाच्या झाडावर ऑक्टोबर/नोव्हेम्बर् एन्ड पर्यन्त अळी पडतच राहणार आहे. कारण सर्वच कंपन्यांनी 25 ग्रॅम नॉन बीटी बियाणे 450 ग्रॅम बियाण्यातच मिक्स करून दिलेले आहे, (कृषी खात्याच्या आदेशामुळे) आणि ती झाडं आपल्या शेतात विखुरलेल्या स्वरूपात आहेत, शेतात चांगले निरीक्षण करा,तुमच्या लक्षात येईलच.

दोन गोष्टी करा, मार्ग निघेल(1) कापुस पिकाला युरिया हे खत जास्त टाकु नका युरियामुळे पीक लुसलुशीत होते,म्हणजे एक प्रकारे ते माजावर येते, आणि जास्त प्रमाणात रोग ,किळ,अळी पिकावर पडतात.(२) नियोनिकोटींन गटातील कीडनाशके आलटून पालटूनच फवारावीत, कारण त्यामुळे पिकाची प्रतिकार क्षमता कमी होते.मोनोक्रोटोफॉस , असीफेट + इमिडकलोरप्राईड यांची कापूस पिकावर फवारणी केल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते व कापूस हे पीक रोगाला

लवकर बळी पडते ,तसेच लुसलुसीत कापसावर गुलाबी बोंड अळीचा पतंग लवकर आकर्षित होतो.कापुस फुल अवस्थेमधें आल्या नंतर म्हणजेच 60 ते 90 दिवसाचा झाल्यावर योग्य ती व योग्य प्रमाणात फवारणी करावी चांगल्या प्रकारे गुलाबी अळीवर नियंत्रण मिळेल.*अमावश्या आणि अळी*मित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे *अमावश्या* सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे

महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात{ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4/5 दिवसात हि उबवतात}त्यतून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो ,

तीच *डोमकली* तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अळी ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग अळीच्या विस्टेमूळे, किँवा कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहितीही पडत नाही की कैरीत अळी आहे ते. आणि म्हणूनच या अळीला कोणतेही किळनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी , ती जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.

मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, *या अळीवर नियंत्रन् करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 23 आणि 24 ऑगस्ट ला,रसशोषक किडी साठी एक औषध, सिलिकॉन स्टिकर आणि निमतेल, किँवा निंबोळी युक्त अर्काची फवारणी करा.आणि 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत अंडीनाशक व अळी नाशकांची फवारणी करावी. किंवा अळी अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून तिचा बंदोबस्त करावा. सेंद्रि अळी व्यतिरिक्त काटेरी अळी, हा एक

प्रकारचा कीडा असतो त्याने कापसाच्या कैरीला डंख मारल्यामुळेही कैरी सडते किंवा किडते त्याचाही बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी या पुढे ज्या काही अळी नाशकांच्या फवारण्या कराल त्या पॉवर पंपाने किंवा पेट्रोल पंपानेच करा म्हणजे म्हणजे अळी, अंडी,रसशोषक किडी आणि काटेरी अळी किंवा किडा {काल ग्रुप वर टाकलेला लेख वाचा व् त्या किड्या चा फोटो हि पहा.} या सगळ्यांचा बंदोबस्त होईल, व कापसाच्या कैरीचे सौरक्षण होईल.

सेंद्रीअळी वर उपाय - अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्थेतील बारीक अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात. म्हणून अमावस्ये नंतर चे 4 दिवस महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.उपाय - अमावस्येच्या 2/3 दिवसांनी म्हणजेच 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान खालील फवारणी करावी. प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी आहे.

निमतेल किंवा नीम अर्क 40 मिलीसिलिकॉन स्टिकर 5 मिलीप्रोफेनोफोस+सापरमेथ्रीन 40 मिली,कारबेनडीझम 40 ग्रॅम(बुरशीनाक ) किंवानिंमतेल किँवा निंबोळी अर्क 40 मिलीसिलिकॉन स्टिकर 5 मिलीप्रोफेनोफोस(प्लेन) 40 मिलीइमामेक्तींन 10 ग्रामकारबेंडिझम 40 ग्रॅम (बुरशीनाशक)वरील दोन पैकी कोणतीही एकच फवारणी करावी.निमयुक्त औषध आणि प्रोफेनोफोस हे अंडी नाशक व बारीक अळी मारण्याचे काम करते,

कोणत्याही परिस्थितीत बोगस कृषी सल्लागागारांच्या सांगण्यावरून किंवा कीड नाशक कंपन्यांच्या भपकेबाज जाहिरातीला अजिबात बळी पडू नक.टीप कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा कापूस पिकावर फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पाने पिवळी पडून पानगळ होते.हा माझा अनुभव आहे.

ची एक,आणि 18/19 सप्टेंबरला 2 री अशा दोन फवारण्या ह्या अळी आणि रसशोषक किडी साठीच कराव्या लागतील.जे शेतकरी न चुकता वरील *2अळी नाशक फवारण्या करतील, त्यांचे कापसाचे उत्पन्न चांगले येईल हे मी खात्रीने सांगतो.धन्यवाद.

 

प्रा.दिलीप शिंदे

भगवती सिड्स ,चोपडा, जिल्हा जळगाव

9822308252

English Summary: What is the relationship between the bullpen and the caterpillar? And read the solution Published on: 23 August 2022, 12:25 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters