1. कृषीपीडिया

परिसराशी मिळते जुळते प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन कसे असते?

परिसराशी मिळते जुळते घेतल्याशिवाय कोणाही सजीवाला सुखाने कालक्रमणा करणे शक्यच नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
परिसराशी मिळते जुळते प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन कसे असते?

परिसराशी मिळते जुळते प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन कसे असते?

परिसराशी मिळते जुळते घेतल्याशिवाय कोणाही सजीवाला सुखाने कालक्रमणा करणे शक्यच नाही. यालाच अनुसरून प्राणीजीवनामध्ये विविध बदलही होताना दिसतात. एकाच जातीचा प्राणी ज्यावेळी विविध हवामानांत राहतो, तेव्हा हळूहळू त्याचे आकारमान, पायांची लांबी, अंगावरची लव, कानांचा आकार यांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतात. या बदलांचे अनेक वर्षे निरीक्षण करून झाल्यावर एक प्रमुख सिद्धांत मांडला गेला आहे. त्यालाच ॲलनचा नियम असे म्हटले जाते. तो असा जसे पर्यावरण अधिक थंड होत जाते, तसे गरम रक्ताच्या प्राण्यांच्या पायांची लांबी कमी होत जाऊन ते अधिक आटोपशीर बनतात. सशांच्या जगाच्या पाठीवर सापडणाऱ्या विविध जातीचे निरीक्षण केले असता हे अगदी उघडपणे दिसून येते. केवळ अमेरिका खंडातील मध्य भागातील ससे व दक्षिणेकडील ससे यात जसा हा नियम दिसतो, तसाच आर्टिक भागातील ससे व उत्तर अमेरिकेतील ससे यातही फरक आढळतो. हरणांच्या जातीतही कॅरीबू जातीची हरणे उंचीला कमी असतात, त्याचेही हेच कारण आहे. एकाच नदीच्या समुद्रमुखाच्या अलीकडे, समुद्रमुखाशी व थोड्या पुढच्या भागात आढळणाऱ्या श्रिंप प्राण्यांबद्दलही असेच घडते, गोड्या पाण्यात या प्राण्याची वाढ जशी होऊ शकते, तशीच खाऱ्या पाण्यातही होते; पण एकाच नदीच्या पात्रातील जेमतेम आठ किलोमीटर अंतरामधील हे तीन विविध भागांतील श्रिंप बाहेर काढून अदलाबदल करून वाढवायचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरतात.

प्रत्येक जात ही प्राण्यातील ठरावीक खारेपणाला पूर्ण गोडेपणालाच सरावलेली असते, हे याचे कारण. विविध हवामानांत वावरणाऱ्या माणसांचा रंग असाच बदललेला दिसतो. भारतातील दक्षिणेकडील सूर्यप्रकाश ऊन जास्त असलेल्या भागातील लोक रंगाने काळे असतात. तर उत्तरेकडील गोरे असतात. गोऱ्या नागरिकांच्या अंगातील रंगद्रव्ये सूर्यप्रकाश कातडीमध्ये व्यवस्थित शोषला जावा, यासाठी कमी झालेली असावीत. शरीरातील चरबीचे प्रमाणही उत्तरेकडे जास्त आढळते. थंडीपासून बचाव करणे हे त्याचे मुख्य कारण आहे.

वनस्पतीजीवन

वनस्पती स्वतःची जागा सोडू शकत नाहीत. त्यामुळे जमीन, हवामान, वाऱ्याचा वेग, पाण्याची उपलब्धी यानुसार त्यांच्यामध्ये अंगभूत बदल होत जातात. सर्वात महत्त्वाचा बदल घडून येतो तो सूर्य प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार.

हे ही वाचा - कडुनिंबच शेतकर्याचा तारणहार

बर्फाळ प्रदेश, कमी सूर्यप्रकाश, झोंबरे वारे याला तोंड देण्यासाठी ओक वृक्ष, सफरचंद, चेस्टनट या झाडांची पाने व फांद्या आडव्याऐवजी उभ्या दिशेने वाढतात एवढेच नव्हे तर पानांची रचना प्रत्येक पानाला पुरेसा उजेड कसा मिळेल, या पद्धतीत विविध कोनांतून तयार होत जाते. एका पानाची सावली दुसऱ्यावर पडू नये याची काळजी घेतली जाते

ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेला सरकताना साचलेला बर्फ आपसूक ओघळून पडावा याचीही पर्णराजी काळजी घेते, समुद्रतटाजवळची व उंच डोंगरउतारावरची झाडे अफाट व सुसाट वाऱ्याला तोंड देण्यासाठी स्वतःला विविध कोनांत बाक घेऊन सज्ज राहतात. या वाऱ्यामुळे वृक्षाच्या पानांतील ओलावासुद्धा झपाट्याने हवेत निघून जाण्याची शक्यता असते. बारमाही वाऱ्याला तोंड देण्यासाठी पाइन वृक्षाची पाने टोकदार होऊन कमीत कमी बाष्पीभवन होईल याची काळजी घेतात, जमिनीतील ओलावा कमी झाला किंवा उन्हाची तीव्रता वाढली की, झाडांच्या पानांची संख्या झपाट्याने कमी केली जाते. मिळणारे पाणी व पानांतील बाष्पीभवन यांची सांगड लगेच घालणे अशावेळी गरजेचे असते. खजुराची झाडे वाळवंटामध्ये तग धरून राहतात. विविध प्रकारचे कॅक्ट्स अत्यंत प्रतिकूल कोरड्या हवामानातही आढळतात. अशा प्रकारच्या झाडांच्या जातींना झेरोफाइट्स म्हणतात. शुष्क व कोरडी झाडे असा त्या ग्रीक शब्दाचा अनुवाद करता येईल.

पर्जन्यवने किंवा रेनफॉरेस्टमध्ये तर असंख्य प्रकारच्या वनस्पती आढळतात. मात्र सतत प्रकाशाची गरज असल्याने त्यांची उंची अन्य भागांपेक्षा जास्त आढळते. घनदाट जंगलामुळे प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळवावाच लागतो. पण येथे मात्र दरीतील झाडांच्या उंचीचा फायदा उठवत सामान्य वेलीही त्यांच्या आधाराने बर्‍याच फोफावलेल्या आढळतात. समुद्री खाडीजवळील मॅकग्रोव्हच्या जंगलात त्यांच्या फांद्यांना फुटलेल्या मुळांच्या मध्ये अडकलेल्या मातीच्या आधाराने अनेक छोट्या वनस्पती वाढतात. समुद्री वनस्पती व समुद्र जलचर यांचे एक सहअस्तित्व त्यामुळेच निर्माण होते. जमिनीवर वटवृक्षाच्या फांद्यांना पुन्हा मुळे फुटत तो वृक्ष आसपासची जागा व्यापताना दिसतो, तसेच येथे खाजणांच्या जंगलात घडते. उखळ पाण्यात सूर्यप्रकाश पोहोचतो. थोड्या खोलीवर गेल्यास तेथील वनस्पतींची मुळे चिखलात व खडकांच्या आधाराने जागा पकडून असली, तरी फांद्यांची व पानांची वाढ पाण्याच्या पृष्ठभागाकडे झेपावताना आढळते. यापेक्षा खोल गेल्यास शेवाळ, अल्गी इत्यादी जातींचे प्राबल्य दिसायला लागते. त्याहीपेक्षा खोलवर फंगायच्या जाती सापडतात. कमीत कमी पाण्यावर वाढणारी व महाराष्ट्रावर सर्वत्र आढळणारी बाभळीची राने त्यांची छोटी छोटी पाने स्वतःच्या टोकदार काट्यांच्या जोरावरच टिकवून धरताना आढळतात. परिसराप्रमाणे जुळवून घेणे, तग धरणे, वाढणे, फोफावणे इत्यादी वनस्पतीजगताला सहज जमते.

 

प्रसारक : दिपक तरवडे

 संकलक : प्रविण सरवदे, कराड

English Summary: What is the life of animals and plants that match the environment? Published on: 28 April 2022, 08:16 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters