मी 4 तारखेला अळी संदर्भाची एक पोस्ट टाकली होती त्यात मी अमावस्ये नंतर अळी केव्हा येईल व फवारणी काय करायची याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे अळी 13 तारखेला च दिसायला लागली व काल पासून डोमकळी सुद्धा कापसावर दिसायला लागली आहे,सर्व ग्रुप वर शेतकऱ्यांनीही या विषयी माहिती दिली,बऱ्याच शेतकऱ्यांनी फोटो हि
टाकले.बऱ्याच जणांनी मला प्रत्यक्ष फोन करून सांगितले.मित्रानो हे दोन फवारे खूप महत्वाचे आहेत,Friends these two fountains are very important,ज्यांनी अद्याप अळी साठीची फवारणी केली नसेल त्यांनी ती ह्या दोन दिवसात करून घ्यावी. मित्रानो ऑक्टोबर महिन्यातील सेंद्री अळी चा अटॅक हा ह्या वर्षी उशिरा म्हणजे 20 तारखेच्या आसपास येईल असे माझे मत आहे, त्याचे कारण असे की या
वर्षी पाऊस ठिबक सारखा पिकांना जीवदान देण्यापूरताच पडलेला आहे जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेले नाही ,त्यामुळे जमिनीतून उष्णता फार मोठ्या प्रमाणात बाहेर आली नाही त्यामुळे 5 ऑक्टोबर पासूनच चांगली थंडी पडायला लागेल असे माझे मत आहे.त्याची चिन्हे आजच दिसत आहेत, आतापासून थंडी जाणवायला लागली आहे.ज्या वर्षी
पाऊस जास्त पडतो त्या वर्षी थंडी कमी आणि उशिराने सुरुवात होते ,व ज्या वर्षी पाऊस कमी त्या वर्षी थंडी लवकर आणि जास्त असते.वरील थंडीचा परिणाम या वर्षी ऑक्टोबर मध्ये पडणाऱ्या अळी वर होईल साधारणतः 18 ℅ च्या खाली रात्रीचे तापमान आल्यास अळी चे अंडे लवकर उबळत नाहीत, त्यामुळे ऑक्टोबर म्हण्याच्या
अमावस्येला येणारा अळीचा अटॅक हा 20 ऑक्टोबर पर्यन्त पुढे ढकलला जाईल, तोपर्यंत कापसाचे पीक हातात येऊन जाईल, याच कारणासाठी माझा सर्व शेतकरी बधूना आग्रह आहे की , सप्टेंबर अमावस्ये नंतरचे अळी साठीच्या दोन्ही फवारणी अगदी वेळेवर करून घ्या,कापसाचे उत्पन्न चांगले येईल.मागच्या वर्षी शेतकरी बधुनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची
अपरिमित हानी झाली होती तशी या वर्षी होऊ नये, म्हणून 22 ते 26 तारखेच्या दरम्यान अळी साठीची एक फवारणी करून घ्या निश्चित फायद्याचे ठरेल असे माझे मत आहे.मित्रानो सध्या सर्वत्र डोम कळी दिसायला लागली आहे 13 ते 17 च्या दरम्यानची फवारणी अद्यापही ज्यांनी केली नसेल त्यांनी ती आजच करून घ्यावी .व 22 ते 26 तारखेच्या दरम्यान जी अळी साठी
फवारणी सुचविली आहे तीही व्यवस्थित करून घ्या, 5 जून च्या आत ज्यांची लागवड असेल त्यांची ही शेवटची फवारणी असेल, 10 जून नंतर ज्यांची लागवड असेल त्यांना, व कोरडची लागवडी साठी मात्र 15/20 ऑक्टोबर दरम्यान अली साठीची एक फवारणी करावी लागेल.सध्या कालपासून पावसाळी वातावरण दिसत आहे
2/4 दिवसात निश्चितच पाऊस येईल असा अंदाज आहे आणि कोरड च्या कापसाला फक्त एकाच पावसाची आवशयकता आहे,त्यावर उत्पन्न येऊन जाईल, कापसाचे भावही चांगले राहतील असा अंदाज आहे,त्यासाठी एका फवारणीसाठी जो खर्च येईल तो खूप नसेल,म्हणून सर्व शेतकरी बंधूनी अली साठीच्या फवारणी करून घ्याव्यात.
शिंदे सर
9822308252
Share your comments