सोयाबिन हे कमी खर्चात भरगोस उत्पादन मिळवून देणारे खरीप हंगामातील महत्वाचे पीक.सोयाबीन पिकामध्ये आपला जो काही खर्च होतो तो म्हणजे कीटकनाशकांवर आणि तो कमी करण्यासाठी सापळा पिके लावू शकतो,तसेच काही प्रमाणात उत्पादन वाढण्यासाठी आंतरपिके सुद्धा घेऊ शकतो.सापळा पिके:-१.झेंडू:- झेंडू हे एक महत्वाचे सापळा पीक आहे जे मावा,पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींना आकर्षित करते.तसेच गोगलगायी सुद्धा आवडीने झेंडू खातात.सोयाबीन पिकाच्या एका बाजूने झेंडूची लागवड केल्यास रसशोषक कीड व गोगलगायीचे प्रभावी नियंत्रण होते.
२.एरंड:-पाने खाणारी अळी(Spodopdera) हि सोयाबीन या पिकासोबत एरंड पिकावर सुद्धा येते. ही कीड सोयाबीन ऐवजी एरंड पिकाला प्राधान्य देत असल्याने सुरवातीस एरंड पिकावर आकर्षित होते.The pest is initially attracted to the castor crop as it prefers castor instead of soybean.पिकाच्या एका बाजूने एरंड लावल्यास पाने खाण्याऱ्या अळीचे पतंग व अळ्या तिकडे आकर्षित होतात त्यानंतर आपण सर्व पिकावर कीटकनाशक फवारण्या ऐवजी फक्त सापळा पिकावर फवारणी केल्यास किडींचा पुरेपूर बंदोबस्त होतो.या एकात्मिक पद्धतीचा वापर केल्यास आपला कीटकनाशकांवर होणारा खर्च निम्म्याहून अधिक कमी येतो तसेच होणारे नुकसान टाळले जाते यासोबतच पाने खाणाऱ्या अळीसाठी व शेंगा पोखरणाऱ्या अळी साठी कामगंध सापळे लावल्यास आपण कीटकनाशकांचा वापरही टाळू शकतो.
सोयाबीन पिकामध्ये आपला जो काही खर्च होतो तो म्हणजे कीटकनाशकांवर आणि तो कमी करण्यासाठी सापळा पिके लावू शकतो,तसेच काही प्रमाणात उत्पादन वाढण्यासाठी आंतरपिके सुद्धा घेऊ शकतो.सापळा पिके:-झेंडू:- झेंडू हे एक महत्वाचे सापळा पीक आहे जे मावा,पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींना आकर्षित करते.तसेच गोगलगायी सुद्धा आवडीने झेंडू खातात.सोयाबीन पिकाच्या एका बाजूने झेंडूची लागवड केल्यास रसशोषक कीड व गोगलगायीचे प्रभावी नियंत्रण होते.एरंड:-पाने खाणारी अळी(Spodopdera) हि सोयाबीन या पिकासोबत एरंड पिकावर सुद्धा येते.
आंतरपिके:- मुख्य पिकासोबतच उत्पादनवाढीसाठी तसेच कीटकांना संभ्रमावस्थेत टाकण्यासाठी आंतरपिकांचा वापर करतो. सोयाबीन मध्ये आपण तूर आणि भुईमूग या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो त्यांचे प्रमाण 3:1 असे ठेवावे म्हणजेच तीन ओळी जर आपण सोयाबीन घेतले तर चौथी ओळ तूर किंवा भुईमुगाची घ्यावी. आंतरपीक घेताना तूर किंवा भुईमूग दोन्ही पैकी एकाच पिकाची लागवड करावी.याचा दुसरा फायदा असा की तूर आणि भुईमूग दोन्ही सुद्धा द्विदल पिके आहेत त्यांच्या मुळामध्ये रायझोबियम जिवाणूंच्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात त्या गाठी मधील रायझोबियम पिकास नत्र उपलब्ध करून देतो त्यानंतर पुढील पिकास नत्राचा भरघोस साठा उपलब्ध करून ठेवतो.
स्रोत:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ.
- IPM SCHOOL
Share your comments