रिंगणी हा आजार नसून एक व्याधी आहे आजतागायतच्या संशोधनावरून अस दिसून आलंय कि क्षार मिश्रणाच्या कमतरतेमुळे जनावरांना रिंगणी होते. यावर कोणतेही औषधउपचार नसून फक्त शस्त्रक्रियेद्वारे जनावर बरे होऊ शकते.
रिंगणी व्याधी होण्यासाठी कारणीभूत घटक :
जनावरांमध्ये रिंगणी होण्यास पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते, जनावरात एकूण तीन प्रकारच्या पटेला असतात त्यांतली मेडिअन पटेला ताठर झाल्यास रिंगणी होते पटेला अस्थी ही सीसमॉईड जातीची अस्थी असून ती लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते.
वयानुसार तिचा आकार हळूहळू वाढत असतो एक विशिष्ट आकार प्राप्त केल्यानंतर तिची वाढ थांबते. या व्याधीमध्ये सांध्याची हालचाल करताना जनावराला त्रास होतो, परिणामी जनावर लंगडत चालते.
लक्षणे : जनावरांच्या मुख्यतः मागील पायामध्ये रिंगणी आढळून येते.
रिंगणीमध्ये जनावरांची चाल ही सामान्य राहत नाही, मागील पायाची हालचाल असामान्य होते.
मागील पायामध्ये गुडघ्याच्या वरील म्हणजे कासेच्या बाजूच्या सांध्यामध्ये हा प्रकार पहावयास मिळतो.
जनावर पाय बाहेरून काढते. जनावरांना चालण्यास अडचण होते.
आजाराची तीव्रता अधिक प्रमाणात असल्यास जनावर जागेवरून हलण्यास निर्बंध येतात.
मागील पाय उचलून पुढे टाकण्याची क्षमता कमी झाल्याने खुर जमिनीला घासले जातात, परिणामी खुरांतून रक्तस्त्राव होतो.
सकाळी उठल्यावर बैल मागील पायाला झटका मारू लागतो, यामध्ये कामाच्या बैलाचा वापर शेतीच्या कामासाठी करता येत नाही.
शस्त्रक्रिया करण्याची पद्धत
१) खुली पद्धत : यामध्ये जनावर जमिनीवर आडवे पाडले जावून शस्त्रक्रिया करण्याच्या जागेवर भूलीचे इंजेक्शन दिले जाते. तिन्ही लीगामेंटची तपासणी करून मधल्या लीगामेंटला कापले जाते.
२) बंध पद्धतीमध्ये : उभ्या जनावरांमध्ये भुलीचे इंजेक्शन देऊन लीगामेंट हाताने अनुभवून मेडिअन पटेला अस्थी तोडली जाते. ही शस्त्रक्रिया शेतकऱ्यांच्या दारी जाऊनही करता येते.
Share your comments