अनेक शेतकरी बंधूनी वरील दोन्ही प्रकारचे जिवाणूचे द्रावण कसे तयार करावे याबाबतची विचारणा केली.वेस्ट डी कंपोझर व इ एम द्रावण तयार करण्याची पद्धत खालील प्रमाणे
1) वेस्ट डी कंपोझर
वेस्ट डी कंपोझर तयार करण्यासाठी 200 लीटर प्लास्टिक ड्रम पाण्याने भरून त्यात 100 ग्रॅम वेस्ट डी कंपोझर टाकावे 2 किलो सेंद्रिय गुळ बारीक कापून त्यात टाकावा व ओल्या गोंनपाटाने झाकून द्यावे, लाकडी दांड्याने रोज सकाळ संदयाकाळ 5 मिनीट ढवळावे प्रत्येक वेळेस झाकून द्यावे 7 व्या दिवशी द्रावण तयार.
वापर
ड्रेंचिंग साठी 5 लिटर वेस्ट डी कंपोझरचे द्रावण +10 लिटर पाणी 15 लिटरच्या पंपात घेऊन प्रत्येक झाडाच्या बुंध्या जवळ 20/25 मिली टाकावे,
ठिबक मधून एकरी 40 लिटर सोडावे.फवारणी साठी 2 लिटर वेस्ट डी कंपोझरचे द्रावण +13 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.पुन्हा द्रावण तयार करण्यासाठी 5 लिटर वेस्ट डी कंपोझर द्रावण (विरजण म्हणून वापरावे) + 195 लिटर पाणी व 2 किलो सेंद्रिय गुळ पुन्हा वरील प्रमाणेच द्रावण तयार करावे असे एका वेस्ट डी कंपोझरच्या बाटली पासून 10/12 वेळा वेस्ट डी कंपोझर द्रावण तयार करू शकता व वापरू शकतात.
वेस्ट डी कंपोझर मध्ये एकूण 80 प्रकारचे जिवाणू असतात , वेस्ट डी कंपोझर चे जिवाणू प्रामुख्याने जमिनीत काम करतात, वेस्ट डी कंपोझर फवारणीतून दिल्यास हे एक सर्वोत्कृस्ट बुरशीनाशकाची काम करते.
इ एम जिवाणू
इ एम जिवाणू 1 लिटर +17 लिटर पाणी +2 किलो सेंद्रिय गुळ एका झाकण असलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये विरघडवून घ्यावे ,ड्रमचे झाकण पक्के लावावे,रोज सकाळ संदयाकाळ 5 मिनिट लाकडी दांड्याने ढवळावे 7 दिसांनी इ एम द्रावण तयार.
वापर
इ एम द्रावण दीड ते 2 लिटर लिटर +13 लिटर पाणी पंपात घेऊन प्रत्येक झाडाला 20/25 मिली ड्रेंचिंग करावे ,ठिबक मधून सोडायचे झाल्या एकरी 5/7 लिटर सोडावे.फवारणी साठी 1 लिटर इ एम द्रावण+14 लिटर पाणी घेऊन पिकावर फवारणी करावी.
इ एम द्रावण 2 लिटर(विरजण म्हणून वापर करावा) +2 किलो सेंद्रिय गुळ +17 लिटर पाणी घेऊन वरील प्रमाणेच द्रावण तयार करावे ,इ एम द्रावण 3/4 वेळा अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा तयार करून वापरावे. इ एम 1 हे जीवाणू जपनिज तंत्र ज्ञानावर आधारित असून,अतिशय सूक्ष्म असतात, जगातील 80 विकसित देशात याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे ,इ एम मद्येहि एकूण 80 प्रकारचे जिवाणू आहेत त्यापैकी 1) बेकरीत वापरले जाते ते यीस्ट, 2)लॅक्टिक ऍसिड, 3) फोटो सिंथेसिस करणारे जिवाणू या 3 मुख्य जिवाणूंची संख्या जास्त प्रमाणात आहे .इ एम जिवाणू प्रामुख्याने हवेतून आपले कार्य करतात, वेस्ट डी कंपोझर सारखेच एइ एम जिवाणूंहि सर्वोत्कृस्ट बुरशी नाशकांची काम करतात.
वरील दोन्ही प्रकारच्या जिवाणूंचे कार्य वेगवेगळे आहे, दोन्ही प्रकारचे जिवाणू 2 वेळा ड्रेंचिंग व 2 वेळा फवारणी साठी एकरी खर्च जास्तीत जास्त 200 ते 250 रुपयांपेक्षा जास्त येत नाही, दोन्ही प्रकारचे जिवाणूं तयार करण्यासाठी नाममात्र खर्च येतो,फक्त फवारणी करणाऱ्या मजुरीचाच खर्च येतो,पण शेतजमिनीचे उत्पादनातं 15/20% वाढ होऊ शकते. म्हणून प्रत्येक शेतकरी बंधूनी ह्या वर्षी ह्या जिवाणूंची 2 वेळा ड्रेंचिंग व 2 वेळा फवारणी करावी.
टीप
वरील दोन्ही प्रकारचे जिवाणू द्रावण करण्यासाठी,ड्रेंचिंग साठी, व फवारणी साठी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचाच वापर करावा.
Share your comments