1. कृषीपीडिया

Wheat crop!ही आहेत गहू पिकासाठी शिफारस करण्यात आलेली तणनाशके

कुठल्याही पिकात योग्य पद्धतीने तणनियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते.तणांचा प्रत्यक्ष प्रभाव हा पिकावर पडत असतो. धनाच्या प्रादुर्भावामुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पादन कमी होते. त्यामुळे योग्य पद्धतीने तणनियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपणगहू पिकासाठी वापरायची आणि शिफारस केलेली तणनाशके याबद्दल माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-agrifarming

courtesy-agrifarming

 कुठल्याही पिकात योग्य पद्धतीने तणनियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते.तणांचा  प्रत्यक्ष प्रभाव  हा पिकावर पडत असतो. धनाच्या प्रादुर्भावामुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पादन कमी होते. त्यामुळे योग्य पद्धतीने तणनियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपणगहू पिकासाठी वापरायची आणि शिफारस केलेली तणनाशके याबद्दल माहिती घेणार आहोत.

 गहू लागवडीनंतर मात्र तणउगवणीपुर्वी वापरावयाची तणनाशके

  • पेंडीमेथीलिन ( टाटा पनिडा,स्टॉम्प )- गहू पेरल्यानंतर ताबडतोब पेंडीमेथिलिन दहा लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मिली या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. याच्या वापराने उगवून आलेले तण नियंत्रणात येत नाही.

गहू लागवडीनंतर मात्र तण उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक

  • फेनोक्साप्रॉप (व्हीप सुपर )- पिकास दुसरे पान आल्यापासून 70 दिवसांपर्यंत वापरता येते.
  • मेझॉसल्फयुरोन मिथाईल( अटलांटिस)- गहू उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसात वापरावे. वापर केल्यानंतर गव्हाची पाने काही प्रमाणात पिवळी पडू शकतात. मात्र दोन आठवड्यात पूर्ववत होतात. वापर केल्यानंतर कडाक्याची थंडी पडल्यास मात्र गव्हाला जास्त इजा पोहोचते.
  • मेट्सुल्फुरोन मिथाईल ( अलग्रीप )- लागवडीनंतर 25 ते 35 दिवसात वापरावे. तनास दोन ते चार पाने असावीत आणि जमिनीत ओल असावी.

 मोकळ्या शेतात लागवडी अगोदर वापरावयाचे तणनाशक

  • पेराक्युएट( ग्रामोक्झोन)- गवत सहा इंच उंच होण्याच्या अगोदर वापरावयाचे. बिन निवडक,उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक. गहू लागवडीपूर्वी वापरावयाचे.
  • ग्लायफोसेट( राऊंड अप )- बिन निवडक,उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक. गहू लागवडीपूर्वी वापरायचे.

 

 टीप- तणनियंत्रणासाठी काही इतर पर्याय उपलब्ध नसल्याचं तणनाशकांचा वापर  करावा. शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर केल्यावर सुद्धा पिकांची वाढ काही काळापुरती मंदावत असते. तण नाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये व पुरेशी असावी . शेजारील व आंतरपिकांचा विचार करून तण नाशकाची फवारणी करणे योग्य असते. कोणतेही तणनाशक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

English Summary: weed antiseptic for wheat crop and process of use Published on: 12 October 2021, 09:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters