शेती आणि संपन्न शेतकरी या ब्रीदासह पुढे जाताना शेतकरी भिमुख संशोधन व विस्तार कार्य आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान अमलात आणणारा कृषी पदवीधर निर्मितीचे ध्येय गाठत आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मिती साठी एकात्मिक प्रयत्नाची मोट बांधू असे आत्मविश्वास दर्शक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे नवनियुक्त कुलगुरू प्रा. डॉ. शरद गडाख यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिवाराचे वतीने आयोजित स्वागत समारंभाचे प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शेतीला आधुनिकतेची जोड देणारे राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय करार, इतर कोणाकडे चाकरी करणारे नव्हे तर इतरांना नोकरी देणारे कृषी पदवीधर घडविणे,To produce agricultural graduates who are employed by others and not employed by others, कौशल्याधारित हायटेक शेती तंत्रज्ञान निर्मिती व प्रसार, मॉडेल व्हिलेज निर्मिती प्रकल्पतर्गत प्रत्येक जिल्ह्यात विकसित खेडे साकारणे,
मोहरी, जवस लागवड आणि व्यवस्थापन
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे पुनर्गठण करणे, एकात्मिक शेती पद्धतीसह विविध विभागाचे सहयोगाने शाश्वत ग्रामविकास साध्य करणे यासह कृषि विद्यापीठाचे मानांकनात अजून सुधाराचे सर्व पर्याय आमलात आणण्यासाठी विद्यापीठातील प्रत्येक घटकाचे तन-
मन-धनाने सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन डॉ. गडाख यांनी पुढे बोलताना केले. महाराष्ट्रासह विदर्भातील एकंदरीत शेती व्यवसायाची जाण असल्याने व गत तीन दशकाहूनही अधिक काळ याच विषयात संशोधनासह सेवा देत असल्याने प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपायोजना कृतीत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा आत्मविश्वास डॉ. गडाख यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. विद्यापीठातील अत्यल्प मनुष्यबळ, कामगारांच्या
समस्या, संशोधन केंद्रांचे प्रश्न सोडवण्यासह दर्जेदार कृषी शिक्षणाच्या पद्धती, स्पर्धात्मक परीक्षांसाठीची वातावरण निर्मिती, अधिकारी -कर्मचारी वर्गांचे सक्षमीकरण करण्यासह आत्मनिर्भर संशोधन केंद्र तथा कृषी विज्ञान केंद्र प्रणाली सह शैक्षणिक संस्थांचे जाळे संपूर्ण विदर्भ स्तरावर निर्माण करीत स्वयंपूर्ण विद्यापीठाचे स्वप्न साकार करण्याकडे सुद्धा भर देणार असल्याचे डॉ. गडाख यांनी पुढे बोलताना सांगितले. कुलसचिव कार्यालयाद्वारे कृषी महाविद्यालय अकोलाच्या स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात
आयोजित या घरगुती स्वागत समारंभाचे प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सर्वश्री श्री. विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय माहोरकर,संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता डॉ.ययाति तायडे, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. कुलदीप ठाकूर, डॉ. प्रकाश कडू, डॉ. नरसिंग पार्लावार, डॉ. विजय माने, डॉ. विष्णुकांत टेकाडे,
कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, विद्यापीठातील सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांचे सह शेतकरी प्रतिनिधी श्री. आप्पा गुंजकर, श्री विजय इंगळे, श्री. श्रीकृष्ण ठोंबरे, श्री. गणेश नानोटे, एनसीसी 11 महाराष्ट्र बटालियनचे श्री चंद्रप्रकाश भदोला, पाणी फाउंडेशन चे संघपाल वाहूरवाघ आदिची उपस्थिती होती. स्वागत समारंभाचे प्रास्ताविक आयोजक कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले तर श्री. विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय
इंगळे, श्री. श्रीकृष्ण ठोंबरे, श्री. गणेश नानोटे, एनसीसी 11 महाराष्ट्र बटालियनचे श्री चंद्रप्रकाश भदोला, पाणी फाउंडेशन चे संघपाल वाहूरवाघ आदिची उपस्थिती होती. स्वागत समारंभाचे प्रास्ताविक आयोजक कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले तर श्री. विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय माहोरकर,संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने यांनी याप्रसंगी
आपले समायोचित मनोगत व्यक्त करीत कुलगुरू महोदयांना विद्यापीठाच्या परिस्थितीचा एकंदरीत आढावा देत अपेक्षा व्यक्त करीत सर्वार्थाने विद्यापीठ शेतकरी विकासासाठी सहयोगाचे धोरण प्रतिपादित केले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्वच प्रक्षेत्र प्रमुख विभागप्रमुख विविध संघटनांचे प्रतिनिधीनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सोबत खांद्याला खांदा लावून
आत्मनिर्भर विद्यापीठाचे स्वप्न कृतीत आणण्याचा जणू संदेश या कार्यक्रमाचे माध्यमातून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर कृषी महाविद्यालय अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांचे मार्गदर्शनात उपक्रम सचिव सामान्य प्रशासन विभाग पोयम व त्यांचे सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Share your comments