विद्राव्य खतेही पिकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळल्यास लगेच संबंधित विद्राव्य खताची फवारणी केली तर ही खते प्रभावीपणे कार्य करतात. जर आपण विद्राव्य खतांची फवारणी सकाळी किंवा सायंकाळी केली तर खूप फायदा मिळतो.
कारण ती लवकर पिकांना उपलब्ध होत असतात. पिकांची वाढ होत असताना विविध अवस्थेनुसार विद्राव्य खतांची फवारणी करावी.
या लेखात आपण विद्राव्य खतांचे विविध प्रकार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कोणते विद्राव्य खत कधी द्यावे? याबद्दल माहिती पाहणार आहोत.
प्रमुख विद्राव्य खते आणि त्यांचा वापर
1-12:61:0- या विद्राव्य खतामध्ये अमोनिकल स्वरुपातील नत्र कमी असतो व पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण अधिक असते.
म्हणून पिकांच्या नवीन मुळाच्या तसेच जोमदार शाखीय वाढीच्या साठी, तसेच फुलपिकामध्ये फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी याचा उपयोग होतो.
नक्की वाचा:मका पिकाच्या उत्पादन वाढीकरिता झिंक सल्फेट या खताचे आदिवासी शेतकऱ्यांना वाटप
2-19:19:19,20:20:20- हे विद्राव्य खते स्टार्टर ग्रेड असून यामध्ये नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात हे विद्राव्य खते असतात. यांचा वापर प्रामुख्याने जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेत असते तेव्हा शाखिय वाढीसाठी करतात.
3-0.52:38- या विद्राव्य खतामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. फुले लागण्यापूर्वी व फुले लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.
फळबागांमध्ये जर आपण डाळिंब पिकाचा विचार केला तर डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच डाळिंब फळाच्या सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.
4-13:0:45- या विद्राव्य खतामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोरा नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता भासते.
पिकामध्ये अन्ननिर्मिती व पिकाच्या विविध भागात अन्नाच्या वहनासाठी हे खत उपयोगी पडते. अवर्षण स्थितीमध्ये पिके तग धरावीत यासाठी या खताचा खूप उपयोग होतो.
5- कॅल्शियम नायट्रेट- मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पिक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर करतात.
Share your comments