1. कृषीपीडिया

जलव्यवस्थापन भविष्याच्या दृष्टीने आहे महत्वाचे!जल है... तो कल है....!जल ही जिवन है...!

नमस्कार शेतकरी बांधवांनो पृथ्वीतलावरचे आजचं पाणी हे उद्याच जिवन आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.अजुन ही मानव दुसर्या ग्रहावर जीवसृष्टी व पाणी शोधत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
water management is so important and crucial for future management in farming

water management is so important and crucial for future management in farming

नमस्कार शेतकरी बांधवांनो  पृथ्वीतलावरचे आजचं पाणी हे उद्याच जिवन आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.अजुन ही मानव‌ दुसर्या ग्रहावर जीवसृष्टी व पाणी शोधत आहे.

पाण्याचं अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आपल्या सूर्यमालीकेतला पृथ्वी हा आहे.आपल्या पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला बाकी २९ टक्के भाग जमिनीचा आहे. त्यातील ९८ टक्के भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित २टक्के पाणी पिण्यासाठी उपयुक्त स्वरूपात आहे.पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे. याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती,वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय ?आपल्या गावातील, शहरातील उद्योगक्षेत्रात नाही का पाणी लागत ? संपूर्ण गोष्टी अपुर्ण रहातात पाण्यामुळे मला हेच सांगायचे आहे की जल व्यवस्थापन हे काळाची गरज आहे.साधारण गोष्ट म्हणजे काही लोकांच्या मनात भावणा असतात कि काल आणलेल पाणी आज शिळं झालं आहे .मला सांगा हे कीती योग्य आहे.जर लोकांना कमी माहीती मुळे असे होते.

जे पाणी आपन आज पित आहे ते पाणी मागच्या वर्षी च्या पावसाचे आहे हे आज लोकांना समजावून सांगावे लागतं आहे.आता आपण उपलब्धता बघितल्यावर गरजांचा अंदाज बघावयास हवा मग ती गरज पिण्याच्या पाण्याची असो की शेती साठी लागणार्या पाण्याची असो त्या गोष्टी चां वापर आपन काट कसरी ने केला तर त्यात काय वावगं आहे.आपन हे सर्व करत असताना आपणाला अडचणी तर येतात त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हे समजणे फार महत्त्वाचे आहे. याचा आपण विचार करायलाच हवा.की अडचणी निर्माण करणारे आपणच आहे व त्यावर तोडगा काढणाराही आपनच आहोत. सर्व पक्षी पशु जनावरं यांना पाण्याची गरज असते. परंतु आता  मानवाच्या च्या गरजा खुप वाढल्या आहे.पूर्वी काय होते की जेथे पाणी असेल तेथेच गाव असायचं आज ही पहा बहुतेक गाव हे नदी घ्या काठावर वसलेले आहे.पण मोठ्या शहरात तेथे पाणी पुरवठा करावा लागतो. जलव्यवस्थापनेत कोठे अडचण निर्माण होत असते. तसेच पाऊस हा लहरी असतो. त्याचे वाटपही समान नसते.

तो कधी खूप पडतो म्हणून महापूर येतो तर कधी अजिबात पडत नाही म्हणून शेतकर्‍याला आकाशाकडे डोळे लावून बघत बसावे लागते.त्यामुळे जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते.जलाचे प्रमाण त्याची उपयोगीता व उपभोगीता म्हणजे प्रत्यक्ष वापर. यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था तरतूद, उपाययोजना म्हणजे जल व्यवस्थापन होय. पावसाळ्यातील पाणी अधिकाध‌िक प्रमाणात अडवुन तेच मातीत जिरविण्यासाठी जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे.पाणी हे जीवन असल्यामुळेच आपले जीवनाचे अस्तित्व आहे व ते सुसह्य पण झाले आहे. असे हे पाणी मात्र आपण अत्यंत काटकसरीने वापरले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे.

बरेच लोक सकाळी दात घासतांना घासून होयीपर्यंत नळ चालूच ठेवतात, दाढी होईपर्यंत नळ चालूच असतो. याला जल साक्षरता म्हणता येणार नाही. आपण पैसा काळजी पूर्वक खर्च करतो, तेव्हढीच काळजी पाणी वापरतांना घेतली पाहिजे........

धन्यवाद..!

श्री डाॅ अतुल पु. कळसकर सर (वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख

कृषी विज्ञान केंद्र घातखेड,अमरावती)

 माहिती संकलन

मिलिंद जि गोदे

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:दिलासादायक बातमी! सिन्नर तालुक्यातील रतन इंडिया औष्णिक प्रकल्पातून लवकरच होणारी वीज निर्मिती

नक्की वाचा:बातमी अतिशय महत्त्वाची! तुकडाबंदीचे नियम रद्द, आता एक - दोन गुंठे जमिनीचा देखील करता येणार व्यवहार

नक्की वाचा:रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या रेपो दर वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

English Summary: water management is so important and crucial for future management in farming Published on: 06 May 2022, 02:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters