गेल्या अनेक वर्षांपासून देशातील शेतकरी बांधवांना पारंपारिक पिकांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी ढगाळ वातावरण, कधी गारपीट तर कधी तीव्र दुष्काळाचा फटका यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
यामुळे देशातील बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला असल्याचे चित्र संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना अधिकच फटका बसला असून गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच मोठे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आता नवीन पिकांकडे वळत आहेत. अलीकडे शेतकरी स्ट्रॉबेरी पिकातही चांगला रस दाखवत असल्याचे चित्र बघायला मिळतं आहे.
आपण स्ट्रॉबेरीची लागवड कोणत्या प्रकारे करू शकतो?
खरं पाहता स्ट्रॉबेरीची गणना हमखास उत्पादन देणाऱ्या पिकांच्या यादीत केली जाते. जगभरात याच्या एकूण 600 जाती आहेत, परंतु भारतात फक्त काही मोजक्याच प्रजातींची लागवड केली जाते. याच्या लागवड ही प्रामुख्याने पॉलीहाऊसमध्ये आणि हायड्रोपोनिक्स पद्धतीने केली जातं आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते हे एक थंड प्रदेशातील पीक आहे. पण ते मैदानी भागातही सहज लावले जाऊ शकते आणि त्यापासून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळवता येते. याशिवाय कृषी तज्ञ सांगतात की, 20 ते 30 अंश तापमान याच्या शेतीसाठी अनुकूल आहे. मात्र तापमान वाढल्याने आणि उत्पादनात घट झाल्यामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांचे नुकसान होते.
Pm Kisan Yojana: पीएम किसानच्या वेबसाईटवर आली 'ही' महत्वाची माहिती; माहितीत नेमकं दडलंय काय?
स्ट्रॉबेरीपासून अनेक प्रकारची उत्पादने तयार होतात
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, स्ट्रॉबेरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सहज करता येते. परंतु वालुकामय चिकणमाती असलेली शेतजमीन याच्या चांगल्या वाढीसाठी अतिशय योग्य मानली जाते. याची लागवड अशा जमिनीत करावी ज्या जमिनीच्या मातीचा पीएच 5.5 ते 6.5 यादरम्यान असतो.
अशा जमिनीत याची लागवड केल्यास त्यापासून अधिक उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरी पिकाचा वापर जॅम, ज्यूस, आईस्क्रीम, मिल्क शेक, टॉफी बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय अनेक प्रकारची ब्युटी प्रोडक्ट बनवण्यासाठीही त्याची फळे वापरली जातात. यामुळे या पिकाला बारामाही मागणी असते.
Mansoon 2022: मान्सून संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; या तारखेला मान्सून येणार महाराष्ट्रात; वाचा
केव्हा करावी याची लागवड?
हिमाचल प्रदेशातील रहिवासी दीपक शांडिल आणि अशोक कमल 5 ते 6 एकरात स्ट्रॉबेरीची लागवड करतात. ते सांगतात की, सर्वप्रथम याची रोपवाटिका तयार करावी लागते. ते फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू करतात.
जून-जुलैपर्यंत त्याची रोपवाटिका पूर्णपणे विकसित होते. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतात लागवड सुरू केली जाते. याचे पीक 40 ते 50 दिवसांत पूर्णपणे तयार होते, त्यानंतर त्याची काढणी सुरू होते.
स्ट्रॉबेरी पिकापासून चांगले उत्पादन मिळणे पूर्णपणे हवामान आणि झाडांच्या संख्येवर अवलंबून असते. रोपांची योग्य काळजी घेतल्यास शेतकरी एक एकरात 80 ते 100 क्विंटल फळे नक्कीच मिळू शकतात. तज्ञांच्या मते, एका झाडापासून 800-900 ग्रॅम फळे मिळतात.
Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
12 ते 13 लाख नफा
दीपक शांडिल सांगतात की, एका एकरात स्ट्रॉबेरीच्या लागवडीमध्ये रोप खर्चापासून ते मल्चिंग आणि ठिबक सिंचनापर्यंत अशा सर्व गोष्टींचा 2 ते 3 लाख खर्च येतो, त्यानंतर त्यांना सुमारे 12 ते 15 लाखांचा नफा मिळतो.
Share your comments