कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ आणि उत्पादकता संतुलित ठेवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे, आणि म्हणुनच उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बियाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट बियाण्याच्या निवडीनंतर त्यावर चांगल्या प्रकारची बीजप्रक्रिया करणे तितकेच महत्वाचे ठरते; कारण पेरणीनंतर अनेक प्रकारचे रोग मुलत: बिजापासून उदभवतात आणि पसरत
असतात. तात्पर्य बियाण्याला बुरशी, कीटक तसेच असामान्य परिस्थिती पासून संरक्षण करण्यास बीजप्रक्रियेचा मोलाचा फायदा होतो.Seeding is of great benefit in protecting against abnormal conditions.बीज प्रक्रियेमुळे पिकास होणारे फायदे-बीजप्रक्रियेमुळे सशक्त
इस्राईल तंत्रावर अधारित खत व्यवस्थापन
आणि गुणवत्तायुक्त रोपे तसेच कीड आणि रोग मुक्त रोपे मिळतात.१) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याद्वारे पसरणार्या रोगांचे नियंत्रण होते-
लहाण बिया (दाणे) असणारी पिके, भाजीपाला आणि कापूस इ. पिकावर बीजप्रक्रिया करणे महत्वाचे ठरते.२) कीटकनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याचे किडींपासून संरक्षण होते- बियाण्याची साठवणूक करण्यापूर्वी त्याला योग्य त्या किटक नाशकाची प्रक्रिया करूनच त्याची साठवणूक करावी, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते.३) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे जमिनीतून पसरणार्या रोगांचे नियंत्रण - जमिनीतील बुरशी,
जीवाणू आणि सूत्राकृमी सुत्रकृमिंपासून बीज आणि ऊगवण झालेल्या रोपांचे संरक्षण होण्यास मदत मिळते.४) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेत वाढ होते - पेरणीसाठी वापरण्यात येणार्या बियाण्याला योग्य त्या किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास कीड आणि बुरशीपासून संरक्षण होऊन उगवण क्षमतेत वाढ होते परिणामी पेरणीसाठी अधिक बियाणे वापरावे लागत नाही.
लेखक-
डॉ. अमोल विजय शितोळे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
Share your comments