1. कृषीपीडिया

रब्बी आणि उन्हाळी पिके घेत अससाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला

ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखे पासून सुरु होणारा रब्बी हंगाम या वर्षी थोडा उशिरा सुरु झाला.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रब्बी आणि उन्हाळी पिके घेत अससाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला

रब्बी आणि उन्हाळी पिके घेत अससाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला

ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखे पासून सुरु होणारा रब्बी हंगाम या वर्षी थोडा उशिरा सुरु झाला. सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने या वर्षी कापूस काढून रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होइल् मका ,ज्वारी ,दादर/शाळू ,हरबरा ,कांदा, गव्हू, हि रब्बीची मुख्य पिके आहेत, त्यांच्या लागवडीत या वर्षी चांगलीच वाढ होईल .मका,रब्बी ज्वारी , दादर/शाळू या पिकांवर कधी नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणात

अमेरिकन लष्करी अळी पडली, या अळी च्या बंदोबस्ता साठी डेसीस 100 डेलिगेट कोराजन,US Army Worms Fall, Decis 100 Delegates Corazon, for this worm's settlement. आवांट अशी फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नाही

जाणून घ्या पंजाब दख यांच्याकडून गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण! आहे तरी कधी?

शेतकऱ्यांनी 2/2 , 3/3 वेळा अळी नाशकाचे फवारणी करून प्रत्येक शेतकरी अमेरिकन लष्करी अळी वर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणा साठी डेसीस आंणि क्विनॉलफॉस या कॉम्बिनेशचा , फॉसफोरफाईव्हचा

आणि फायटर या सेंद्रिय अळी नाशकाचा ज्या शेतकऱ्यांनी उपयोग केला त्यांना चांगला फायदा झालेला दिसतो, दीर्घ काळ पर्यंत अळी नियंत्रणात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मका या पिकाला झिंक लव्हिंग प्लांट म्हणतात , साधारणतः 30/35 दिवसाचे पीक झाल्यावर चिलेटेड झिंक 20 ग्रॅम फवारणी करावी, खताच्या दुसऱ्या हप्त्यात 40/45 दिवसांनी 10 किलो झिंक सल्फेट

द्यावे ,वापसा स्थितीतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात , मका निसवल्या नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 2 पाणी अत्यंत आवश्यक असतात.उन्हाळी पिके - भुईमूग, बाजरी वैशाखी मूग, उन्हाळी तीळ ,गवार ,कांदा , सोयाबीन वेलवर्गीय भाजीपाला पिके ढेमसे ,कार्ले गिळले ,दोडके , खरबूज, टरभुज, काकडी या पिकांची लागवड

साधारणतः 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत केली जाते.15 फेब्रुवारी नंतर लावलेल्या उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात जसजशी लागवड उशिरा होते तसतसे उत्पन्नात घट होत जाते , त्यासाठी कोणतेही उन्हाळी पीक 15 फेब्रुवारीच्या आतच लागवड करावी.भगवती सिड्स च्या सर्व (40) ग्रुप्स वर उन्हाळी पिकांची सविस्तर माहिती, डिसेंम्बर महिन्यात दिली जाईल .

 

प्रा.दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Very important agronomic advice for growing rabi and summer crops Published on: 04 November 2022, 07:56 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters