उच्चतम कापूस उत्पादनासाठी एकरी कापसाच्या झाडांची संख्या महत्त्वाची आहे.सर्वसाधारण पणे मागील 5 वर्षापासून अतिघन लागवड पद्धती उपयोगात आणली जात आहे.पण त्यामुळे होणारे दुष्परिणाम न पाहता लागवड केली जाते.उदा 4 बाय 1 अंतरास यामध्ये कापसाचे झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही व ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस झाल्यास
सुरुवातीची उत्कृष्ट वजनाची कापसाची बोंडे खराब होतात. Early best weight cotton bolls are spoiled. म्हणून अतिघन पद्धत योग्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते व अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.भरगोस उत्पन्नासाठी 6 बाय1 किंवा 5 बाय 2/2.5 या पद्धतीचा अवलंब करावा.आपण आता 5 बाय 2 किंवा 6 बाय 1 याचे उत्पादन वाढीचे सूत्र समजून घेणार आहोत.उच्चतम उत्पादनासाठी प्रथम आपण शेतकरी बांधवांकडे उपलब्ध असलेल्या केळीच्या ठिबक
सिंचन प्रणाली वर कापसाची लागवड 5 बाय 2 या अंतरावर केली जाऊ शकते.ती केली असता सर्वसाधारण 4300 ते 4400 कापसाची रोपे बसतात. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना आंतर मशागत दोन्ही बाजूस करणे सोपे जाते त्यामुळे कमी खर्चात तण नियंत्रण करणेही शक्य होते.या पद्धतीत एकरी 4300 ते 4400 झाडे असतात त्यास प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाची 50 ते 70 बोंडे (कैरी) लागल्यास 250 ते 300 ग्रॅम कापूस प्रति झाड मिळतो.
या पद्धतीने गुणोत्तर केल्यास सरासरी एकरी 11ते 12 क्विंटल कापूस उत्पादन मिळते.याच पद्धतीस उत्कृष्ट नियोजन केल्यास प्रति कापसाचे झाडास 100 ते 125 कापसाची बोंडे (कैऱ्या) सहज लागतात. याचे गुणोत्तर काढले असता सर्वसाधारणपणे एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंत कापसाचे उत्पन्न मिळू शकते. हे उत्पन्न प्रथम आहे फरदड चे उत्पन्न बोनस मिळते.या उत्पन्नासाठी 1)पाणी+ 2)रासायनिक खते व वेळेचे महत्व व त्याबरोबर महत्त्वाचे सेंद्रिय व जैविक खते+ 3)योग्य जातीची निवड ही महत्त्वाची त्रिसूत्री लक्षात ठेवणे महत्त्वाची आहे.
प्रा.दिलीप शिंदे
9822308252
Share your comments