1. कृषीपीडिया

अशा प्रकारे करा गांडूळ शेती वाटचाल होईल समृद्धीकडे

गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता ही निर्विवादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी फार कमी खर्च येतो. शिवाय त्यापासून मिळणारे खताचे मूल्य अमूल्य असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गांडूळ खताचा वापर करून घ्या भरपुर उत्पन्न

गांडूळ खताचा वापर करून घ्या भरपुर उत्पन्न

गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता ही निर्विवादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी फार कमी खर्च येतो. शिवाय त्यापासून मिळणारे खताचे मूल्य अमूल्य असते.

गांडूळ जीवनक्रम : गांडूळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडूळांचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलतेनुसार 7 ते 20 दिवसांची असते. गांडूळांची अपूर्ण अवस्था दोन ते तीन महिन्यांची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरील अर्धा सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडूळाचे आयुष्य दोन तेे तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडूळाची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते. एका किलोमध्ये सर्वसाधारण पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडूळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकूल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याऐशी हजार होते. पिले व प्रौढ गांडूळे एका किलोमध्ये साधारणतः दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडूळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.

गांडूळ संवर्धन आणि खत निर्मिती :

1) जागेची निवड आणि बांधणी : गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमिन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्परचे छत तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर व उंची 3 मीटर आणि लांबी गरजेनुसार असावी. छप्परामध्ये 1 मीटररुंद व 20 सेंटीमीटर खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.

2) गांडूळ खाद्य : चराच्या तळाशी साधारणतः 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. त्यानंतर या थरावर गांडूळे सोडावीत. यावर पुन्हा 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर कुजलेले सेंद्रिय खत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर 20 ते 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. हा गादीवाफा बारदानने (गोणपाट) झाकावा. दररोज या गादी वाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होऊन गांडूळ खत तयार होईल.

या पद्धतीने 15 ते 20 दिवसात गांडूळखत तयार होते. शेणखतामध्ये गांडूळांची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत देखील उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळखत करता येते. 

खड्ड्यामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खांद्यावर चार ते पाच दिवस पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूसंवर्धक (बॅक्टरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रियेस वापरावे. या प्रक्रियेसंदर्भातील आणखीन सविस्तर माहिती, संवर्धक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे-5 यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरिया व एक किलो सुपर फॉस्फेट प्रती टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होऊन गांडूळखत लवकर तयार होईल.

गांडूळ खताचे फायदे :

1. जमिनीचा पोत सुधारतो. 2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 3. गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता, त्यांची उत्तम मशागत केली जाते. 4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 5. जमिनीची धूप कमी होते. 6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.

7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.

8. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 9. गांडूळ खतामध्ये ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद,पालाश व इतर सूक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते

3) गांडूळखत वेगळे करणे : गांडूळखत आणि गांडूळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळखताचे ढिग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडूळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडूळखत वेगवेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव किंवा खुरपे यांचा वापर करू नये. या साहित्यांच्या वापरामुळे गांडूळांना इजा पोहचण्याची शक्यता असते. 

या व्यतिरिक्त दुसर्‍या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळ खताचा थर हलक्या हाताने वेगळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडूळ खतामध्ये गांडुळांची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. हे गांडुळांचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकांसाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.

 

गांडूळ खत वापरण्याची पद्धत व एकरी मात्रा :

1. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर गांडूळ खताची मात्रा अवलंबून असते.

2. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5 टक्केच्यावर असेल तर 2 टन गांडूळखत प्रती एकर प्रती वर्षी ही मात्रा योग्य आहे. मात्र, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी असेल तर इतर कंपोस्ट शेणखत किंवा हिरवळीचे खत व पेंडी यांची जोड देऊन गांडूळखत वापरावे.

 

– प्रा. मोनिका सुरेंद्र भावसार व प्रा. मयुरी अनुप देशमुख

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.

English Summary: Vermicompost do use go to good path Published on: 20 January 2022, 08:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters