1. कृषीपीडिया

भाजीपाला कलम ; भविष्यात ठरणार शेतकऱ्यांच्या फायद्याचं

बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला शेती कारण तसं नवीन नाही पण या परस्थितीमुळे कधी –कधी तोटाही होत असतो. आज आपण पाहतो बदलणारे ॠतुचक्र, अवकाळी पाऊस, रोज नवीन येणारे पीकांवरती रोग आणि किडी, घटत चाललेलं उत्पन्न यामुळे शेती ही फायद्याची नाही असंही काही जण म्हणतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला शेती कारण तसं नवीन नाही पण या परस्थितीमुळे कधी –कधी तोटाही होत असतो. आज आपण पाहतो बदलणारे ॠतुचक्र, अवकाळी पाऊस, रोज नवीन येणारे पीकांवरती रोग आणि किडी, घटत चाललेलं उत्पन्न यामुळे शेती ही फायद्याची नाही असंही काही जण म्हणतात; पण बळीराजांने काळ्या मातीची साथ सोडली नाही. कारण त्याला जणू निसर्गाने नियमच घालून दिला आहे. शेती करतोय म्हणजे जगाला पोसायची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तो आत्मविश्वासाने ती जबाबदारीही पेलतो. त्याच्या कामात संशोधक शास्त्रज्ञ मदत करतात आणि बदलत्या वातावरणावर मात करून शेतकऱ्यांसाठी शेती कशी सहज होईल यासाठी प्रयत्नशील असतात.

त्या प्रयत्नात त्यांना यश पण येत आणि शेतकरी राजाचे जीवनमान सुखद करतात. शास्त्रज्ञांच्या शोधातील एक शोध म्हणजे भाजीपाला कलम तंत्रज्ञान. या तंत्राच्या माध्यमातून आपण अधिक उत्पन्न घेऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेला प्रश्न म्हणजे शेती परवडणारी नाही हाही दूर होईल. शेतीमध्ये जर आपण भाजीपाल्याची शेती केली तर रोजचा पैसा आपल्या हाता राहतो. पण भाजीपाल्यांमध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट आहे.  अधिक रोगराई असल्याने उत्पन्न घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे आणि रोग-किडींच्या नियंत्रणासाठी खर्च ज्यास्त होत असल्याने भाजीपाल्याची शेती फायद्याची ठरत नाही. मग शेती करायची तर कशी? भाजीपाला शेती ही रोजचे हातात चलन देणारी आहे. पण अशा परिस्थितीत भाजीपालाशेती करणे फार अवघड असते. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत शास्त्रज्ञांनी एक शोध घेतला आणि भाजापाला शेतीत कलम पद्धत विकसित केली.

तसे पहिले गेल तर कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. त्याचा उत्पन्न, गुणवत्ता, प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्यासाठी फळझाडांना खूप फायदाही झाला आहे. आता हे कलम करण्याचे तंत्र भाजीपाला शेतीतही आले आहे.  भाजीपाला कलम तंत्रज्ञान एक चांगला पर्याय बनू शकतो.

 


कलम केलेल्या भाजीपाला लागवडीचा हेतू काय?

आजच्या घडीला भाजीपाल्याची घटत चाललेल्या गुणवत्तेला जैविक आणि अजैविक ताण मुख्य कारणीभूत आहेत. जैविक ताणाला आवाक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषधांचा वापर बेलगामपणे केला जातो. याने उत्पन्न वाढते पण मनुष्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होताना दिसत आहेत.

कलमाचे फायदे

भाजीपाल्यांमध्ये माती जनित रोगांचे प्रमाण जास्त आहे. रोगप्रवण क्षेत्रांमध्ये रोगप्रतिरोधक वाणांची लागवड उत्तम पर्याय आहे पण कलम तंत्रज्ञानाने या रोगांना नियंत्रणात आणले जाऊ शकते.

यामध्ये कुकुरबिटॅसी वंशावाळीमध्ये (काकडी, भोपळा, कलिंगड इ.) मधील फुसेरियम विल्ट आणि सोलानेसी (टोमॅटो, वांगी, मिर्ची इत्यादी) वंशावाळीमध्ये मधील बॅक्टेरिया विल्टसारखे माती जनित रोग कलम तंत्रज्ञानाणे नियंत्रणात येऊ शकतात. त्याचबरोबर त्याचे इतरही फायदे आहेत उत्पन्न वाढ, कमी किंवा जास्त तापमानवाढीचा ताण सहन करण्यासाठी मदत, रोग व जंत प्रतिकारशक्ती वाढते, पाणी आणि मूलद्रव्यांचे ग्रहण करण्याची क्षमता वाढते, क्षारयुक्त मातीसाठी सहनशीलता वाढवण्यासाठी पण उपयोगी आहे.

कसे कराल कलम , या आहेत कलमाच्या पद्धती

रूटस्टॉकवर साओन कलम करण्यासाठी विविध कलम पध्दती आहेत.  योग्य कलम पध्दतीची निवड पीक, पिकाचा आकार, पीक वाढीचा टप्पा आणि दोन वनस्पतींच्या एकमेकांबद्दल अनुरूप होण्यावर अवलंबून असते. योग्य रूटस्टॉकची निवड भाजीपाला कलम उद्योगाच्या यशस्वी होण्यामागचे गुपित आहे. त्यासाठी पुढील काही पध्दती भाजीपाला कलम तंत्रज्ञानमध्ये वापरल्या जातात.

खोगीर कलम : सायन रोपाला योग्य उंचीवर छाटून त्या टोकाला तासून पाचरीसारखा आकार आणतात. सायन रोपाला पाचरीसारखा केलेला भाग घट्ट बसेल अशी खाच कलम फांदीला योग्य जागी पाडतात. अशी जोडवणूक केल्यानंतर पुढची सर्व क्रिया भेट कलमाप्रमाणे करतात.

जातो. जो सायन निवडला आहे त्याला व्ही आकाराचा कूट घेतला जातो व लगेच रूटस्टॉकच्या उभ्या कापामध्ये घातला जातो आणि त्यानंतर स्प्रिंग क्लिप लावळी जाते.  दरम्यान या कलम तंत्रज्ञानात काही समस्य़ा येत असतात. जर आपण त्या समस्या पार केल्या तर आपण कलम शेतीत नक्कीच यश मिळवू.

 


भाजीपाला कलम तंत्रज्ञानमध्ये येणाऱ्या समस्या-

  • भाजीपाला कलम तंत्रज्ञानमध्ये कुशल कामगारांची गरज असते.
  • रूटस्टॉक व सायनच्या बियाणे लागवडीचे नियोजन योग्यवेळी करावे लागते.
  • कलम भरण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या पॉलिहाऊसची सुविधा आवश्यक असते.
  • कलम तंत्रज्ञानामुळे बीजजनित रोगांचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे कलम करण्याचे काम ग्रीन हाउसमध्येच झाले पाहिजे.

भाजीपाला कलम तंत्रज्ञानचे फायदे-

  • भाजीपाला कलम तंत्रज्ञान वापरून बऱ्याच रोगांना विशेषत: माती जनित रोग आहेत. ज्यांचा उगम मातीमध्ये होतो आणि पीक वाढीच्या सुरूवातीच्या काळात मर जास्त होते, त्याचे नुकसान कमी करता येते.
  • कलम तंत्रज्ञानाणने उत्पन्न व गुणवत्ता सुधारली जाऊ शकते.
  • संबंधित पिकाला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी फायदा होतो. त्याचबरोबर कमी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी लागवड करणे शक्य आहे.

भाजीपाला कलम तंत्रज्ञानचे तोटे-

  • कलम केलेले रोप किंमतीने महाग पडते.
  • कधी कधी कलम केलेल्या रोपांची वाढ गरजेपेक्षा जास्त होते. व फळाची गुणवत्ता सुमार दर्जाची होते.
  • भाजीपाल्याची काढणीवर येण्यासाठी लागणारा वेळ कलम केलेल्या पिकांमध्ये वाढतो.
  • रूटस्टॉक व सायनचा वाढीचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या व्यवस्थापनावर पडतो.

भविष्यात होऊ शकते कलम शेतीत भरभराटी -

भाजीपाला कलम तंत्रज्ञान तसे आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी नवीन जरी असले तरी येत्या काळात त्याची निकडीची गरज भासणार आहे.  या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर होत असतो. अधिक रासायनिक खतांचा वापर करुन पिकावलेल्या भाज्यांमुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या शेतीत आपण मर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा व औषधांचा वापर करू शकतो.

कमी पाण्यात उत्पन्न  - अनेक भागात पावासाची अनिश्चिता वाढली आहे. पावसा झाला काही ठिकाणी पाणी पुरेसे नसते. अशा ठिकाणीही आपण आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवू शकतो.  दरम्यान भाजीपाला कलम तंत्रज्ञानामध्ये म्हणावं तसे यश आले नाही.  त्यामध्ये एक म्हणजे रूटस्टॉक व सायनचा एकमेकांची सुसंगतपणा, दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांचे गुणधर्म पिकाच्या पूर्ण वाढीच्या काळात आणि फळधारणा व गुणवत्तेवरती परिणाम होत असतो. पण समस्या  संशोधनातून दूर होऊ शकतात.

English Summary: Vegetable grafting technique useful for farmer in future Published on: 16 May 2020, 06:26 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters