मा.कुलगुरू,संचालक, शास्त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्यांची शिवार फेरी संपन्न!
राज्यासह राष्ट्रीय स्तरावर विविध पिक वाणे तथा संशोधनात्मक शिफारसी आणि यंत्रे अवजारांसह "शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी" साकारण्यासाठी कटिबद्ध असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनात्मक प्रक्षेत्रावर वर्षभर विविध पिक लागवडीसह संशोधनात्मक उपक्रम राबविले जातात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभागाचे वतीने
बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली अतुल आखरे यांचे पुढाकाराने बीजतंत्रज्ञान विषयक विविध प्रयोग व शिफारशींचे प्रथम रेषीय प्रात्यक्षिके विद्यापीठातील विविध पिकांच्या प्रजातींवर शास्त्रीयदृष्ट्या सुबद्ध पद्धतीने साकारण्यात आले आहेत. प्रक्षेत्रावरील विविध प्रयोगाला विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.विलास भाले यांचेसह संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विविध विभागांचे तथा परिक्षेत्राचे प्रमुख
अधिकारी कर्मचारी तथा विद्यार्थी वर्गाने भेटी देत बीज तंत्रज्ञान प्रात्यशिके तथा नाविन्य जाणून घेतले.
डॉ. आखरे यांच्या या उपक्रमाबद्दल कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी समाधान व्यक्त केले व शेतकरी बांधवांनी सुद्धा विद्यापीठाच्या या प्रक्षेत्रावर भेटी देत आपल्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करून घ्यावे तथा आधुनिक बीज तंत्रज्ञान समजून घ्यावे असे आवाहनही या प्रसंगी केले.
शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी" साकारण्यासाठी कटिबद्ध असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनात्मक प्रक्षेत्रावर वर्षभर विविध पिक लागवडीसह संशोधनात्मक उपक्रम राबविले जातात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभागाचे वतीने बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली अतुल आखरे यांचे पुढाकाराने बीजतंत्रज्ञान विषयक विविध प्रयोग व शिफारशींचे प्रथम रेषीय प्रात्यक्षिके साकारण्यात आले.
Share your comments