भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान, पुणे येथे होत असलेल्या अनेक खाजगी कंपन्या, कृषी विद्यापीठांचे स्टॉल, पाणी नियोजन, यंत्रसामुग्री, रोपवाटिका, कृषी लघुउद्योग, जनावरांच्या वेगवेगळ्या जाती, त्याचप्रमाणे अनेक कृषीतज्ञ यामध्ये सहभागी होऊन आपआपले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडत आहेत. या कृषी प्रदर्शनामध्ये १६ डिसेंबर रोजी तब्बल २५००० शेतकऱ्यांची भेटीची नोंद झाली आहे. तर यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा भाग ठरणारी कंपनी
म्हणजे वरद क्रॉप सायन्स, जालना येथील या कंपनीने तब्बल तीस वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या हृदयात घर केलेले असताना वरद कंपनीचा स्टॉल हा खरोखरच आकर्षणाचा भाग बनला आहे. या स्टॉलला एका दिवसात तब्बल २५ ते ३० हजार शेतकरी भेट देऊन वरद क्रॉप सायन्स या कंपनीच्या उत्पादनांची व परत तंत्राच्या माहितीचा उपभोग घेतात. प्रदर्शनातील ॲग्री इनपुट हॉल मध्ये वरद क्रॉप सायन्स चा स्टॉल क्रमांक २४८ आहे.Varad Crop Science has stall number 248 in the Agri Input Hall of the exhibition. या स्टॉल कडे शेतकरी आकर्षित होण्याचे मुख्य कारण म्हणजे या
कंपनीचे उत्पादने सर्व प्रकारच्या पिकांवरती जलद पद्धतीने फरक दाखवते तर वरद तंत्र तयार करून शेतकऱ्यांना समाधान देण्याबरोबरच त्यांचा आनंद वाढवण्याचे काम सातत्याने ही कंपनी करत आहे. या कंपनीच्या स्टॉलचे उद्घाटन घनसावंगी तालुक्यातील तीन वर्षांपासून वरद तंत्राचा वापर करणारे प्रगतशील शेतकऱ्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या प्रगतशील शेतकऱ्याने प्रेमळ शब्दांनी शुभेच्छासुध्दा दिल्या.किसान कृषी प्रदर्शन व अशा अनेक कृषी प्रदर्शनाच्या
माध्यमातून वरद तंत्राचा आणि वरद क्रॉप सायन्स च्या उत्पादनांचा प्रचार प्रसार करत आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी खर्चात दुप्पट करण्याचा आमचा उद्देश आहे. किसान या कृषी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कृषी तज्ञांना विनंती आहे की वरद क्रॉप सायन्स च्या स्टॉलला भेट देऊन तंत्राचा आणि कृषीज्ञानाचा उपभोग घ्यावा अशी विनंती वरदच्या कृषीतज्ञांनी या माध्यमातून केली आहे.
Share your comments