शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला तरी,शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती,करोडपती आहेत.खत,बी-बियाणे, कीटकनाशके पुरवणारे कृषि सेवा केंद्रवाले असोत की,शेतीत उत्पादन कसं वाढवायचं,कोणती पिकं घ्यायची,याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत,त्यांचंही छान चाललयं.यांनाही शेतीतील जोखमीचा फटका बसत नाही. फटका बसतो तो फक्त शेतकऱ्यांना.हा जमाना प्रसिद्धीचा,खऱ्या खोट्या प्रचाराचा,मार्केटिंगचा आहे.त्यात भलं-बुरं दोन्ही खपवलं जातं.
हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणारं असतं.This marketing confuses the farmers.कोणी म्हणतं,आंबा लावा,डाळिंब लावा,कोणी द्राक्ष... कोणी शेवगा लावा म्हणतं तर कोणी बांबू लावा,चंदन लावा म्हणतं.
वाचा वाल पिकाची लागवड तंत्रज्ञान व माहिती
कोणी भाजीपाला लावायला सांगतं तर कोणी फुलशेती करा म्हणतं...एक नाही, शेकडो सल्ले.डोळे फिरवणाऱ्या अनेक यशकथा. कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं तर एक एकर आंब्यात २५लाखाचं उत्पन्न झाल्याचं सांगणारा टी.व्ही.वर झळकतो.प्रत्येक यशकथा वाचली,बघितली
की,शेतकऱ्यांच्या डोक्यात त्याचं अनुकरण करण्याचा किडा वळवळू लागतो. विशिष्ट पिकं घ्या म्हणून मार्गदर्शन करणारे सल्लागार त्या पिकांचे सगळे फायदे सांगतात मात्र त्यातील जोखमीबाबत कोणीच बोलत नाहीत.कारण त्यांना त्यांचं बियाणं,रोपटी विकायची असतात. आज त्याला नेमकं काय मार्केट आहे.उद्या काय राहिल,याबाबत बोलणं ही फारच दूरची गोष्ट. एकाने एक नवा प्रयोग केला नि त्यात थोडसं यश मिळालं की,अनेकजण त्याचं अनुकरण करतात.लागवड करून जेव्हा उत्पादन विकायची
वेळ येते तेव्हा लक्षात येतं की,त्याला बाजारात फारशी मागणीच नाही.त्यातून हे हौशी प्रयोगशील शेतकरी मोठ्या नुकसानीत येतात. मग शेतीच्या नावानं रडारड अधिकच वाढते.गेल्या काही वर्षांपासून अशी अनेक उदाहरणं मी आजुबाजुला पाहतोय.कधी शेतकऱ्यांना जिट्रोबाची लागवड करायचा सल्ला मिळाला,कधी सुबाभूळ तर कधी आणखी कुठली औषधी वनस्पती. शहामृग पालनात माझे चार मित्र लाखोत बुडालेत.शहामृगाचं अंड म्हणजे सोन्याचं अंड असाच प्रचार होता.हजाराला,दिड हजाराला विकलं जातं,असं
सांगीतलं जायचं...हा सगळा प्रचार खोटा निघाला.चंदन लावा,रक्तचंदन फार फायदेशीर,सागवान लावा हे फंडेही होऊन गेलेत.मागे एकाने मला बांबु लागवडीबद्दल फोन केला.त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मी म्हटलं, आतापर्यंत कितीजणांना बांबू लावलाय?.. माझ्या बोलण्यातील खोच लक्षात आल्याने त्यानं फोन बंद केला.शेतजमीनीत मोठं वैविध्य आहे.काळी माती,तांबडी माती,मध्यम दर्जाची,हलकी ,मुरमाड. भरपूर अन्नद्रव्य असलेली,निकृष्ट,भरपूर पाणी सहन
करण्याची क्षमता असलेली.कमीतकमी पाणी लागणारी,चिबाड,लगेच वापसा होणारी...असे जमिनीचे कितीतरी प्रकार आहेत.त्या जमिनीच्या पोतानुसार,तिथं विशिष्ट पिकांचं उत्पादन चांगलं येतं.कोणत्या जमिनीत कोणतं पिक चांगलं येतं,हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं.आपल्याकडंच मनुष्यबळ, भांडवल, सिंचन सुविधा आणि जोखीम पचवण्याची क्षमता काय,हे माहित असतानाही, अनेकदा प्रचाराला बळी पडून शेतकरी प्रयोग करतात आणि हमखास बुडतात.
Share your comments